Happy Birthday Shoaib Akhtar: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आज त्याच्या 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. अख्तरचा जन्म 1975 मध्ये पाकिस्तानच्या (Pakistan) रावलपिंडी (Rawalpindi) येथे झाला होता. त्याचा वेगपाहून त्याला रावलपिंडी एक्सप्रेस (Rawalpindi Express) या नावानं ओळखलं जाऊ लागलं. शोएब अख्तरनं 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. तो गेल्या 11 वर्षांपासून गुडघ्याच्या दुखापतीनं ग्रस्त होता. नुकतीच त्यानं मेलबर्नमध्ये त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली होती.
शोएब अख्तरनं त्याच्या वाढदिवसानिमित्त व्हिडिओद्वारे त्याच्या चाहत्यांनी संपर्क साधला. तसेच त्यानं गुडघ्याच्या शस्त्रक्रियेबद्दलही सांगितलंय. "शस्त्रक्रियेनंतर मला बरं वाटत आहे. हळूहळू माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ लागला. मी आठ ते बारा आठवड्यात बरा होईल. पण आता मी फिरत आहे. मी आता कोणालाही भेटण्याच्या स्थितीत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. तुमची प्रार्थना आणि प्रेमामुळं लवकरात लवकर बरा होत आहे." त्याच्या वाढदिवशी रावळपिंडी एक्सप्रेसनं त्याच्या चाहत्यांना एक वाईट बातमी दिली, "मला पाच वर्षांनंतर माझा गुडघा पूर्णपणे बदलावा लागेल. बर्फ, वेदना आणि गोळ्या... गेल्या पाच-सहा दिवसांपासून माझ्या आयुष्यात हेच चालू आहे", असंही शोएब अख्तरनं म्हटलंय.
व्हिडिओ-
शोएब अख्तरची कारकीर्द
पाकिस्तानचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज अख्तरनं आपल्या वेगाने फलंदाजांच्या मनात त्याच्याबद्दल भीती निर्माण केली होती. त्यानं आपल्या कारकिर्दीत 163 एकदिवसीय सामने खेळले आणि 247 विकेट घेतल्या आहेत. तर, 46 कसोटी सामन्यात 178 विकेट घेतल्या आहेत. त्यानं टी-20 सामन्यातही भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. त्यानं 15 टी-20 सामन्यात 19 विकेट्स घेतल्या आहेत.
शोएब अख्तरच्या वादांची चर्चा
शोएब त्याच्या कारकिर्दीत चांगल्या कामगिरीमुळं तसेच अनेकदा वादांमुळे चर्चेत राहिला आहे. त्यानं 1997 मध्ये कसोटीत आणि 1998 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी झालेल्या वादामुळं तो चर्चेत राहिला. इतकंच नाही तर अख्तरवर एकेकाळी ड्रग्ज बाळगल्याचा आरोपही झाला होता. एका मीडिया रिपोर्टनुसार, 2006 मध्ये तो ड्रग्जमुळं प्रसिद्धीच्या झोतात आला होता. सहकारी गोलंदाज मोहम्मद आसिफसोबतच्या भांडणामुळं अख्तर चांगलाच चर्चेत आहे.
हे देखील वाचा-