Ishan Kishan and Aditi Hundia Love Story: भारतीय क्रिकेट संघाचा युवा तडाखेबाज फलंदाज ईशान किशनची (Ishan Kishan) गर्लफ्रेन्ड अदिती हुंडियाची (Aditi Hundia) सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs South Africa 2nd ODI) ईशान किशनचं थोडक्यात शतक हुकलं. त्यानंतर ईशानचे चाहते सोशल मीडियाद्वारे त्याला इमोशनल सपोर्ट करताना दिसले. त्याचवेळी अदिती हुंडियानं ईशान किशनच्या दमदार खेळीचं सोशल मीडियाद्वारे कौतूक केलं. तिनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये 'वेल डन आयके' असं लिहिलं. या पोस्टनंतर अदिती चांगलीच चर्चेत आली आहे. 


ईशान किशन आणि अदिती हुंडिया दिर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी ईशान किशनच्या वाढदिवसाच्या दिवशी दोघांचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. एवढंच नव्हे तर, आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबईच्या संघानं ईशान किशनवर 15 कोटींची बोली लावली, त्यानंतर अदितीनं प्राऊड अॅण्ड हॅप्पी अशी कमेंट केली होती. त्यावेळी अदितीची खूप चर्चा सुरू झाली होती. 


2017 च्या मिस इंडियाची फायनलिस्ट
अदती कपड्यांचं ब्रँड लेबल अदिती हुंडियाची फाऊंडर आहे. तसेच ती 2017 च्या मिस इंडियाची फायनलिस्ट आणि सुपरनेशल 2018 देखील ठरली आहे. याचबरोबर 2017 मध्ये मिस इंडिया राजस्थान टायटल जिंकलं आहे. दरम्यान, 2016 मध्ये एलीट मिस राजस्थानमध्ये तिनं मिस ब्यूटीफुल आईज आणि मिस बॉडी ब्युटीफुलचा खिताब जिंकलाय.अदितीचा जन्म जानेवारी 1997 मध्ये जयपूर येथे झाला. तिचं शिक्षण इंडिया इंटरनॅशनल शाळेत झालंय. त्यानंतर पुढं तिनं जयपूरच्या सेट झेवियर्स कॉलेजमधून बिझनेस एडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण घेतलं. अदिती ही दिसायला खूप सुंदर आहे. तिच्यासमोर बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या दिसतात. 


आयपीएल 2019 च्या अंतिम सामन्यानंतर चर्चेत 
आयपीएल 2019 मध्ये अदितीनं सर्वांचं लक्ष तिच्याकडं वेधून घेतलं. आयपीएल 2019च्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील अंतिम सामन्यात अदिती हुंडिया चेअर्स करताना दिसली होती.तेव्हापासून तिच्या आणि ईशान किशनच्या नात्याची चर्चा सुरु झाली होती. 


हे देखील वाचा-