IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत 7 विकेट्सनी विजयी झाला आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर भारताने अफलातून गोलंदाजी करत अवघ्या 99 धावांवर दक्षिण आफ्रिकेला सर्वबाद केलं. यावेळी कुलदीपनं 4, सुंदर, शाहबाज आणि सिराज यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्यानंतर 100 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताने शुभमन्या 49 धावांच्या जोरावर सामना 7 विकेट्सनी सामना जिंकला. तर सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...


IND vs AUS 10 महत्त्वाचे मुद्दे-



  1. सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. आजही नाणेफेक जिंकून भारताने सामना जिंकला आहे. 

  2. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्यात भारताने आधी अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या 99 धावांवर दक्षिण आफ्रिकेला सर्वबाद केलं.

  3. सामन्यात सर्वप्रथम म्हणजे नाणेफेक जिंकत भारताने गोलंदाजी घेतली.  

  4. दक्षिण आफ्रिकेचा संघ 27.1 षटकांत अवघ्या 99 धावांवर ढेपाळला.

  5. भारताकडून चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि शाहबाज अहमद यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. 

  6. दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर शिखर धवन (8 धावा) आणि ईशान किशननं (10 धावा) सुरुवातीला संयमी खेळी केली. परंतु, भारताच्या डावातील सातव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर कर्णधार शिखर धवन रनआऊट झाला.

  7. त्यानंतर अकराव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ईशान किशनच्या रुपात भारताला दुसरा धक्का बसला. दरम्यान, युवा फलंदाज शुभमन गिल (49 धावा) आणि श्रेयस अय्यरनं (नाबाद 28 धावा) संघाचा डाव सावरला.

  8. संघाला अवघ्या तीन धावांची गरज असतान शुभमन गिल आऊट झाला. अवघ्या एका धावानं त्याचं अर्धशतक हुकलं. भारतानं हा सामना सात विकेट्स राखून जिंकला.

  9. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी ,बी. फॉर्च्युन यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.

  10. या विजयासह भारतानं तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 नं जिंकलीय.  


हे देखील वाचा-