Shikhar Dhawan Record : धवनकडे मोठा रेकॉर्ड करण्याची संधी, वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या सामन्यात रचणार इतिहास?
वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिला सामन्यात भारताचा कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक वय असताना भारताचा कर्णधार म्हणून अर्धशतक ठोकण्याचा मान मिळवला. ज्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात तो आणखी एक रेकॉर्ड करु शकतो.
Shikhar Dhawan : भारत आणि वेस्ट इंडीज (IND vs WI) यांच्यात सध्या एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने तीन धावांनी जिंकला. ज्यानंतर आता उद्या (24 जुलै) दुसरा सामना खेळवला जणार आहे. दरम्यान या सामन्यात कर्णधार शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) एक खास रेकॉर्ड करण्याची संधी आहे. केवळ दोन चौकार खेचताच तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये 800 चौकार पूर्ण करु शकतो. सध्या खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये ही कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू असेल.
याआधी बऱ्याच खेळाडूंनी ही कामगिरी केली आहे. ज्यामध्ये भारताचा दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर 2016 चौकारांसह अव्वलस्थानी आहे. पण सध्या खेळणाऱ्यांमध्ये इतके अधिक चौकार असणारा शिखर एकमेव खेळाडू आहे. त्याच्यानंतर क्विंटन डी कॉक 650 चौकारांसह यादीत असून त्यानंतर सध्या खेळणाऱ्यांमध्ये इतर कोणताच खेळाडू 500 हून अधिक चौकार एकदिवसीय सामन्यात ठोकू शकलेला नाही.
सहाव्यांदा 'नर्व्हस 90' चा शिकार
पहिल्या एकदिवसीय सामन्यात 97 धावा करुन शिखर बाद झाला असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये 90 पेक्षा अधिक धावा करुनही शतक न झळकावता आल्याची शिखरची ही सहावी वेळ आहे. यामुळे शिखर अशाप्रकारे बाद होण्याच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. यामध्ये देखील पहिल्या स्थानावर सचिन तेंडुलकर (18) तर दुसऱ्या स्थानावर मोहम्मद अझहरुद्दीन (7) आहे. शिखरच्या एकदिवसीय कारकिर्दीचा विचार करता त्याने 153 सामन्यांत 6 हजार 422 रन केले आहेत.
हे देखील वाचा-
- Shikhar Dhawan : धवनचं शतक हुकलं, सहाव्यांदा झाला 'नर्व्हस 90' चा शिकार, पण एक खास रेकॉर्ड केला नावावर
- ICC T20 World Cup 2022 : 'विश्वचषकात भारताला कोहलीची गरज पडणार', अजित आगरकरने सांगितलं कारण
- WI Vs IND: अखेरच्या षटकात 15 धावा रोखण्याचं आव्हान, दोन आक्रमक फलंदाज क्रिजवर; त्यांनाही पुरून उरला मोहम्मद सिराज!