एक्स्प्लोर

Sharad Pawar: टीम इंडियाच्या विजयाची तुलना सर्जिकल स्ट्राईकशी, द्रविड गुरुजींचं कौतुक, शरद पवार वर्ल्डकप जिंकल्यानंतर काय म्हणाले?

Pune News: टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धा जिंकल्याबद्दल शरद पवार यांनी त्यांचे अभिनंद केले. जसप्रीत बुमराह आणि सुर्यकुमार यादव्यचा कामगिरीचे कौतुक. कुणी सर्जिकल स्ट्राईक केला, कुणी चांगला कॅच घेतला, चांगल्या शिक्षकामुळे भारतीय संघाचा विजय

पुणे: भारतीय संघाने शनिवारी रात्री बार्बाडोसच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ट्वेन्टी-20 विश्वचषकावर नाव कोरले होते. या विजयानंतर टीम इंडियावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनीही पुण्यात बोलताना टीम इंडियाच्या कामगिरीचे कौतुक केले. भारतीय संघाच्या या विजयात काहीजणांनी सर्जिकल स्ट्राईकसारखा चमत्कार दाखवला, कोणी चांगला झेल घेतला. या सगळ्यामुळे आपण विश्वचषक स्पर्धेतील (T 20 World cup) विजयाचा दुष्काळ संपवला, असे शरद पवार यांनी म्हटले. 

भारतीय संघाला अत्यंत उत्तम शिक्षक मिळाला. द्रविड यांची कामगिरी महत्त्वाची आहे. द्रविड यांनी दिलेले योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी दिलेले सल्ले यामुळे सामूदायिक यश मिळाले, असेही शरद पवार यांनी सांगितले. 

विराट कोहली आणि रोहित शर्माची ट्वेन्टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती, शरद पवार म्हणाले...

विराट कोहली आणि रोहित शर्मा ट्वेन्टी-20 क्रिकेटमधून निवृत्त होत आहेत. दोन्ही खेळाडू अतिश्य उत्तम आहेत. फॉर्ममध्ये असतानाच रिटायरमेंट घेणं योग्य असते. दोघांचंही जागतिक क्रिकेटमध्ये मोठं योगदान आहे.  नव्यांना संधी मिळावी, माझ्या मते हा निर्णय योग्य. सचिन तेंडुलकर निवृत्त झाले आणि अनेकांना प्रोत्साहित  केले. या दोघांचा निर्णय बरोबर असून मी त्यांचं अभिनंदन करतो, असे शरद पवार यांनी म्हटले.

सुर्यकुमार यादवचं शरद पवारांकडून कौतुक

एकेकाळी जगाच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचं वेगळं स्थान होतं. अलीकडे भारतीय संघाने आपले वेगळे स्थान निर्माण केले. ट्वेन्टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला अधिक वेळ लागला. विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला अधिक वेळ लागला. भारतीय टीमने अद्भुत प्रकारचा चमत्कार केला. सुरुवातीला धावसंख्या पाहिल्यानंतर चिंता वाटावे अशी स्थिती होती. जसप्रीत बुमरा  आणि सुर्यकुमार यादव चांगली कामगिरी केली, असेही शरद पवार यांनी म्हटले.

पंढरीच्या वारीत मी पायी चालणार नाही: शरद पवार

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे यंदा पंढरीच्या वारीत पायी चालणार असल्याची चर्चा आहे. मात्र, शरद पवार यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. मी बारामती ते इंदापूरमधल्या सणसरपर्यंत पायी चालणार ही बातमी खोटी आहे.  पंढरपूरला जाणारी वारी माझ्या गावावरून जाते.  त्या ठिकाणी एक दिवस मी थांबणार आहे. पालखीच्या  स्वागतासाठी मी थांबणार आहे. मात्र मी पालखीसोबत  चालणार नाही तर तिच्या स्वागतसाठी तिथे जाणार आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा

वर्ल्डकप जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींचा टीम इंडियाला फोन, रोहित शर्माला म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP MajhaAmol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेलKisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget