सिंधुदुर्ग : ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू ज्याच्या फिरकीनं अवघ्या क्रिकेट विश्वाला वेड लावलं होत त्या शेन वॉर्न(Shane Warne) यांचं गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 52 व्या वर्षी शेन यांचे अचानक झालेले निधन सर्वच क्रिकेट जगताला चटका लावणारे आहे. ऑस्ट्रेलियातच नाही तर संपूर्ण जगात शेन यांचे लाखो चाहते होते. भारतातही शेन वॉर्नचे अनेक चाहते होते. दरम्यान त्यामुळे भारतातही अनेकांनी वॉर्न यांना श्रद्धांजली वाहिली असून सिंधुदुर्गमध्ये शेनचे वाळुशिल्प साकारण्यात आले आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी शेन वॉर्नचं वाळूशिल्प साकारत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले जवळील आरवली समुद्र किनाऱ्यावर हे वाळूशिल्प साकारलं आहे. सुमारे दीड टन वाळूच्या साहाय्याने हे वाळूशिल्प साकारलं आहे. रविराज चिपकर हे शेन वॉर्नचे चाहते असल्याचं त्यांनी सांगितलं.


शेन वॉर्न यांची कारकीर्द


जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू तसंच एक दिग्गज कर्णधार अशी शेन वॉर्न यांची ख्याती होती. ऑस्ट्रेलियाकडून अनेक वर्ष क्रिकेट खेळलेला वॉर्न क्रिकेट जगतात बहुतेक सर्वांना माहित आहे. वॉर्न यांनी 145 कसोटी सामन्यात 708 विकेट्स घेतल्या आहेत. तर 194 एकदिवसीय सामन्यात 293 गड्यांना माघारी धाडलं आहे. याशिवाय 55 आयपीएल सामन्यात वॉर्नने 57 विकेट मिळवल्या आहेत. मुरलीधरननंतर वॉर्न हा दुसरा गोलंदाज आहे ज्याने 708 विकेट घेतल्या आहेत. 2007 साली वॉर्ननं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वॉर्ननं क्रिकेटमधील प्रत्येक फॉर्मेटमध्ये आपली छाप सोडली आहे.  


महत्त्वाच्या बातम्या; 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha