IND vs SL, 1st Test, Mohali: मोहालीत भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. आज सामन्याचा दुसऱ्या दिवशी भारताने दमदार कामगिरी करत आपला पहिला डाव 574 धावांवर घोषीत केला. यामध्ये रविंद्र जडेजाने दमदार खेळी केली आहे. जडेजा 175 धावांवर नाबाद राहिला आहे. तर मोहम्मद शमी 20 धावांवर नाबाद राहिला आहे. 8 विकेटच्या मोबदल्यात भारताने श्रीलंकपुढे 574 धावंचा डोंगर उभा केला आहे.
आज कसोटी सामन्याचा दुसरा दिवस आहे. या दिवशी भारताने दमदार कामगिरी केली आहे. रविंद्र जडेजच्या दिडशतकी खेळीच्या बळावर भारताने लंकेसमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. 8 गड्यांच्या मोबदल्यात भारताने लंकेसमोर 574 धावांचे आव्हान उभे केले आहे. 574 धावांवर कर्णधार रोहित शर्माने आपला पहिला डाव घोषीत केला आहे. त्यमुळे आता भारत मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजाची निर्णय घेतला. पहिल्या दिवशी भारतीय संघाने 85 षटकांत 6 बाद 357 धावा केल्या. पहिल्या दिवशी ऋषभ पंतने 97 चेंडूमध्ये 96 धावा केल्या. तर हनुमा विहारीने 128 चेंडूत 58 धावा केल्या. विराट कोहलीचा हा शंभरावा कसोटी सामना आहे. मात्र कोहली 45 धावा करुन तंबूत परतला होता.
दरम्कयान, कसोटी कारकीर्दीतील शंभरावा सामना खेळणाऱ्या विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये आठ हजार धावा केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्ध मोहालीमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. कोहलीने सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या उपाहारानंतर विश्वा फर्नांडोच्या चेंडूवर आठ हजारावी धाव पूर्ण केली. कसोटी क्रिकेटमध्ये आठ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा भारताचा सहावा खेळाडू आहे. कोहलीने आपल्या 100व्या कसोटीच्या 169व्या डावात 8000 धावा पूर्ण केल्या. याशिवाय 100 व्या कसोटीत आठ हजार धावांना गवसणी घालणारा विराट हा ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉण्टिंगनंतरचा दुसराच खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या: