Shane Warne: महान फलंदाज शेन वॉर्नच्या आकस्मित मृत्यूने अवघ्या जगाला धक्का बसला आहे. शेन वॉर्नच्या मृत्यूमुळे केवळ ऑस्ट्रेलियाच नव्हे तर जागतिक क्रिकेटचं मोठं नुकसान झालं आहे. शेन वॉर्नची 15 वर्षाची क्रिकेट कारकीर्द वादळी ठरली. फलंदाजांचा कर्दनकाळ असलेल्या शेन वॉर्नला मात्र भारताचा सचिन तेंडुलकर भारी पडला होता. तो इतका भारी होता की शेन वॉर्नच्या स्वप्नातही सचिन यायचा आणि त्याच्या गोलंदाजीवर धुलाई करायचा. हे स्वत: शेन वॉर्नने कबुल केलं होतं.
क्रिकेटप्रेमींना 1998 साली शारजामध्ये झालेला शेन वॉर्न आणि सचिनचा मुकाबला चांगलाच आठवणीत आहे. त्यावेळी सचिनने या लेग स्पिनरची अशी काही धुलाई केली होती की त्याच्यासमोर शेन वॉर्न पूर्ण निष्प्रभ बनवलं. सचिन शेन वॉर्नच्या गोलंदाजीचा सामना करताना अनेकदा पुढे यायचा आणि त्याला शॉर्ट पिच गोलंदाजी करण्यास प्रवृत्त करायचा. कधी-कधी तो मागे सरकायचा आणि चेंडू बॅटवर घेऊन तो थेट सीमापार लगवायचा. सचिनच्या या धुलाईमुळे शेन वॉर्न आणि ऑस्ट्रेलियन संघ भलताच वैतागला होता.
ऑस्ट्रेलियाचा संघ जेव्हा भारताच्या दौऱ्यावर आला होता त्यावेळी शेन वॉर्नचा सामना कोण करणार याची चिंता अनेकांना लागली होती. त्यावेळी सर्वांच्यासमोर फक्त एकच नाव आलं, ते म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिननेही वॉर्नच्या फिरकीचा सामना करण्यासाठी कसून सराव केला. त्याने मुंबईमध्ये अत्यंत खराब खेळपट्टी तयार केली आणि त्यावर चांगलाच सराव केला. त्यावेळी झालेल्या कसोटी सामन्यात सचिनने शेन वॉर्नची अशी काही धुलाई केली होती की वॉर्नला काहीच समजायचं नाही. सचिन आपल्या स्वप्नात येतो आणि आपल्या गोलंदाजीवर धुलाई करतो असं खुद्द शेन वॉर्नने कबुल केलं होतं.
सचिन तेंडुलकरने आतापर्यंत त्याच्या बॅटच्या तालावर अनेक गोलंदाजांना नाचवलं. त्याने सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या शेन वॉर्न विरोधातही अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. सचिनने ऑस्ट्रेलियाच्या संघात शेन वॉर्न असताना एकूण 12 कसोटी सामने खेळले. त्याने 60 च्या सरासरीने धावा केल्या. त्यामध्ये सचिनने पाच शतकं आणि पाच अर्धशतकं ठोकली. तसेच वॉर्नविरोध खेळतांना 17 सामन्यामध्ये सचिनने 58.70 च्या सरासरीने आणि पाच शतकांच्या मदतीने 998 धावा केल्या.
संबंधित बातमी: