Shakib Al Hasan: बांग्लादेश क्रिकेट बोर्डनं (BCB) 27 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया चषकासाठी 17 सदस्यांची घोषणा केलीय. बीसीबीनं आशिया चषक, न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात बांग्लादेशचा स्टार ऑलराऊंडर शाकीब अल हसनकडं (Shakib Al Hasan) संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. शाकीब अल हसन बांग्लादेशच्या क्रिकेट संघातील अनुभवी खेळाडू आहे. त्यानं अनेक सामन्यात दमदार प्रदर्शन करून बांग्लादेशला विजय मिळवून दिला. दरम्यान, शाकीब अल हसनच्या नेतृत्वात बांग्लादेशचा संघ कशी कामगिरी करतो? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

बांग्लादेश क्रिकेट बोर्ड ऑपरेशनचे अध्यक्ष जलाल युनूस यांनी बैठकीत असं म्हटलंय की, शाकीब अल हसन आगामी आयसीसी टी-20 विश्वचषकापर्यंत बांग्लादेशच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. 

आशिया चषकासाठी बांग्लादेशचा संघ
शाकिब अल हसन (कर्णधार), अनामूल हक, मुशफिकुर, अफिफ हुसैन, मोसाद्देक हुसेन, महमुदुल्लाह, महेदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, हसन महमूद, मुस्तफिझूर, नसुम अहमद, शब्बीर रहमान, महेदी हसन मिराज, पार, नबादत हुसैन अहमद, नाबाद हसन.

आशिया चषकाचं संपूर्ण वेळापत्रक-

सामना दिवस दिनांक संघ ग्रुप  ठिकाण 
1 शनिवार 27 ऑगस्ट अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका बी दुबई
2 रविवार 28 ऑगस्ट भारत विरुद्ध पाकिस्तान दुबई
3 मंगळवार 30 ऑगस्ट बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान  बी शारजाह
4 बुधवार 31 ऑगस्ट भारत विरुद्ध पात्र संघ दुबई
5 गुरुवार 1 सप्टेंबर श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश  बी दुबई
6 शुक्रवार 2 सप्टेंबर पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ शारजाह
7 शनिवार 3 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 शारजाह
8 रविवार 4 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
9 मंगळवार 6 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 सुपर 4 दुबई
10 बुधवार 7 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
11 गुरुवार 8 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
12 शुक्रवार 9 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
13 रविवार 11 सप्टेंबर सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2 सुपर 4 दुबई

हे देखील वाचा-