Shakib Al Hasan, बांगलादेश : बांगलादेशचा स्टार क्रिकेटर आणि अष्टपैलू खेळाडू शकिब-अल-हसनच्या (Shakib Al Hasan) अडचणी वाढल्या आहेत. अलीकडेच बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनादरम्यान एका व्यक्तीची हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी शाकिबसह एकूण 156 जणांना आरोपी करण्यात आले आहे. मोहम्मद रुबेल नावाच्या व्यक्तीचा ढाका येथे निदर्शनादरम्यान मृत्यू झाला होता. या व्यक्तीच्या हत्येचा आरोप शाकिबसह 156 जणांवर आहे. निदर्शनादरम्यान, व्यवसायाने कापड व्यापारी असलेल्या रुबेलवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर एका दिवसाने रुबेलचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुरुवारी म्हणजेच 22 ऑगस्ट रोजी रुबेलचे वडील रफिकुल इस्लाम यांनी आपल्या मुलाच्या हत्येच्या आरोपाखाली पोलीस ठाण्यात जात गुन्हा दाखल केला होता. वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये त्यांनी अवामी लीगच्या 154 स्थानिक कार्यकर्त्यांना आरोपी केले आहे. यामध्ये शाकिब-अल-हसन (Shakib Al Hasan) आणि पंतप्रधान शेख हसीना यांच्या नावाचाही समावेश आहे.


400-500 अज्ञात लोकांचाही तक्रारीत उल्लेख 


एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, 400-500 अज्ञात लोकांचाही उल्लेख या तक्रारीत करण्यात आला आहे. या खटल्यातील नोंदवण्यात आलेल्या जबाब असा की, मृत रुबेल हिने 5 ऑगस्ट रोजी अडाबोर परिसरात झालेल्या शांतता आंदोलनात भाग घेतला होता. शेख हसीना आणि इतरांकडून आदेश मिळताच लोकांनी आंदोलकांवर गोळीबार करून हल्ला केला. या घटनेत रुबेलच्या छातीत दोन गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला.रावळपिंडीत पाकिस्तानविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या कसोटी सामन्यात शाकिब बांगलादेशच्या संघाचा भाग असणार आहे. मात्र, शाकिबला या हत्याप्रकरणात कशामुळे आरोपी करण्यात आले? हे समजू शकलेले नाही. चार्जशीटनुसार, शाकिबला आरोपी नंबर 28 बनवण्यात आले आहे. 


बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा शाकिबला मोठा इशारा 


बांगलादेश क्रिकेट बोर्डाने अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार शाकिबला मोठा इशारा दिला आहे. नुकतेच बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष झालेल्या फारुख अहमद यांनी शाकिबला इशारा दिलाय.  बांगलादेशमध्ये संघाच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या शिबिरात सहभागी न झाल्यास भवितव्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे म्हटले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वी शाकिबने तयारी शिबिरात भाग घेतला नव्हता.


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Bandh : न्यायालयाने हीच तत्परता आरोपींना शिक्षा देण्यासाठी दाखवावी; उद्धव ठाकरेंकडूनही 'महाराष्ट्र बंद मागे'