Rohit Sharma Ritika Sajdeh: एका पुरस्कार सोहळ्यासाठी भारताच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) पत्नी रितीका सजदेह (Ritika Sajdeh) देखील उपस्थित होती. मात्र या कार्यक्रमदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत असल्याने रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाप होणार असा दावा नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
रोहित शर्मासोबत त्याची पत्नी रितिका सजदेह उपस्थित होती. या कार्यक्रमातील रितीकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ CEAT क्रिकेट रेटिंग पुरस्कार सोहळ्यातील आहे. रितीकाच्या या व्हिडीओवर चाहते 'ज्युनिअर हिटमॅन लवकरच येणार' अशी प्रतिक्रिया देत आहेत.
2015 मध्ये रोहित अन् रितिकाचा विवाह
रोहित आणि रितिकाने एकमेकांना सहा वर्ष डेट केले. रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांचा विवाह 13 डिसेंबर 2015 रोजी झाला. त्यानंतर लग्नाच्या 3 वर्षानंतर म्हणजेच 30 डिसेंबर 2018 मध्ये रोहित आणि रितिका त्यांच्या मुलीचे पालक झाले. रोहितच्या मुलीचे नाव समायरा आहे. 6 जानेवारी 2019 रोजी त्याने आपल्या सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या मुलीचे नाव जाहीर केले होते.
रोहित शर्मा आहे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची एकूण संपत्ती 214 कोटी रुपये आहे. मॅच फी व्यतिरिक्त टीम इंडियाचा कर्णधार आयपीएल आणि जाहिरातींमधून करोडो रुपये कमावतो. बीसीसीआयने रोहित शर्माला A+ ग्रेड करारात ठेवले आहे. अशाप्रकारे रोहित शर्माला बीसीसीआयकडून वर्षाला अंदाजे 7 कोटी रुपये मिळतात. याशिवाय रोहित शर्माला कसोटी सामन्यांसाठी 15 लाख रुपये मिळतात. तर एक वनडे खेळण्यासाठी 6 लाख रुपये मिळतात. रोहित शर्माचा आयपीएल संघ मुंबई इंडियन्ससोबत करार आहे. मुंबई इंडियन्स संघ रोहित शर्माला दरवर्षी 16 कोटी रुपये देतो. रोहित शर्मा अनेक मोठ्या ब्रँडशी संबंधित आहे. तसेच रोहित शर्मा स्वतःची क्रिकेट अकादमी चालवतो. त्यामुळे हिटमॅन रोहित शर्मा करोडो रुपये कमावतो.
रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार
रोहित शर्माला सीएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्समध्ये पुरूषांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयरचा किताब देण्यात आला. रोहित शर्माला त्याची उत्कृष्ट फलंदाजी आणि उत्कृष्ट कर्णधार म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. रोहित शर्माने या कार्यक्रमात टी- 20 विश्वचषकाच्या विजयावरही भाष्य केलं. भारतीय कर्णधार रोहित शर्माने विजयाचे श्रेय देताना तीन खास नावे घेतली. हिटमॅनने सांगितले की, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी मिळविण्याच्या त्याच्या प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा दिला होता, असं रोहित शर्मा म्हणाला.
संबंधित व्हिडीओ:
पहिले शिवी, मग सॅल्यूट; रोहित शर्माचा व्हिडीओ एकदा बघाच, तुम्हालाही हसू आवरणार नाही!