एक्स्प्लोर

Asia Cup 2022: दुखापतग्रस्त असतानाही शाहीन आफ्रिदी पाकिस्तान संघासोबत, वाचा नेमकं कारण

Shaheed Afridi : दुखापतीमुळे पाकिस्तानचा आघाडीचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी बाहेर पडल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. पण तरी युएईमध्ये शाहीन पाकिस्तान संघासोबत आहे.

Shaheen Shah Afridi out of Asia Cup : पाकिस्तानचा आघाडीचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून (Asia Cup 2022) बाहेर पडला आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतही तो सहभागी होऊ शकणार नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मेडीकल टीमने त्याला चार ते सहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान या दुखापतीचा उपचार हा दुबईत होणार असून आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघही दुबईत असल्याने शाहीन संघासोबतच असणार आहे. 

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) निवेदन जारी करून शाहीन स्पर्धेतून बाहेर पडल्याची माहिती दिली. अफ्रिदीला पुनरागमन करण्यासाठी काही आठवडे लागतील, असेही बोर्डाने म्हटले होते. स्कॅन रिपोर्ट आल्यानंतर पीसीबीने तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला. यानंतर जास्त काळ खेळू शकणार नसल्याचे निश्चित झाले.

भारताच्या टॉप ऑर्डरला दिलासा

शाहीन आफ्रिदी बाहेर पडल्याने भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरला मोठा दिलासा मिळाला आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शाहीनने जवळपास 70% सामन्यांमध्ये पहिल्याच षटकात विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात पहिल्याच षटकात त्याने रोहित शर्माची विकेट घेतली होती. यानंतर त्याने केएल राहुल आणि विराट कोहलीलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्या सामन्यात टीम इंडियाला 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. विश्वचषकात पाकिस्तानकडून भारताचा हा पहिलाच पराभव ठरला.

विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त होण्याची आशा

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकापर्यंत शाहीन फिट होईल, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आशिया चषक आणि विश्वचषक दरम्यान पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सात टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. शाहीन या मालिकेत उपलब्ध होणार नाही.

आशिया कपसाठी पाकिस्तान संघ

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर. (शाहीनची रिप्लेसमेंट अजून जाहीर झालेली नाही)

हे देखील वाचा-

Asia Cup 2022, Rohit Sharma : आशिया कपमध्ये कसं आहे हिटमॅन रोहित शर्माचं प्रदर्शन? वाचा आकडेवारी 

Deepak Hooda: दिपक हुडा टीम इंडियासाठी ठरतोय लकी! सलग 16 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतानं मिळवलाय विजय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 25 January 2025Suresh Dhas PC : संतोष देशमुखांचे आरोपी फासावर जातील तेव्हाच समाज शांत  होईल- सुरेश धसJitendra Awhad : राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याची हत्या,दादांच्या नेत्यावर आरोप,आव्हाडांचा गौप्यस्फोट!Mumbai Jana Aakrosh Morcha : वाल्मिक कराड किती मोठा गुंड आहे? आम्ही असे लय फोडून काढलेत...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Beed News: वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
Ambadas Danve:वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
Yes Bank : येस बँकेची  दमदार कामगिरी सुरुच , तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
येस बँकेची दमदार कामगिरी, तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
Srinagar Katra Vande Bharat Express : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Video : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Embed widget