एक्स्प्लोर

इंग्लंड-भारत कसोटीआधी 542 विकेट घेणारा गोलंदाज निवृत्त

Shahbaz Nadeem : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यामध्ये सात मार्चपासून पाचव्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. धर्मशालामध्ये कसोटी सामना सुरु होण्याआधीच भारताच्या (Team india) फिरकी गोलंदाजानं निवृत्तीची घोषणा केली आहे.

Shahbaz Nadeem : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यामध्ये सात मार्चपासून पाचव्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. धर्मशालामध्ये कसोटी सामना सुरु होण्याआधीच भारताच्या (Team india) फिरकी गोलंदाजानं निवृत्तीची घोषणा केली आहे. डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीम यानं मंगळवारी निवृत्तीची घोषणा (left-arm spinner Shahbaz Nadeem announces retirement) केली. त्यानं क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली. शाहबाज नदीम याने भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले आहेत, पण त्यानंतर तो भारतीय संघात स्थान मिळवू शकला नाही. 

शाहबाज नदीम देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंड संघाचं प्रतिनिधित्व करत होता. त्यानं रणजी स्पर्धेत (2022-23) राजस्थानविरोधात आपला अखेरचा फर्स्ट क्लास सामना खेळला, त्यानंतर निवृत्तीची घोषणा केली. शाहबाज नदीमच्या नावावर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 542 विकेटची नोंद आहे. शाहबाज नदीम जगभरात होणाऱ्या विविध टी 20 लीग स्पर्धेत खेळला आहे. 

34 वर्षीय नदीमने 'ईएसपीएनक्रिकइन्फो' सोबत बोलताना निवृत्तीच्या वृत्ताला दुजोरा दिला. तो म्हणाला की, खूप दिवसांपासून मी निवृत्तीचा विचार करत होता. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या मते तुमच्याकडे काही करण्याची प्रेरणा (भारतासाठी खेळण्याची) असेल, तर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावाच. पण मला माहितेय, आता भारतीय संघात मला स्थान मिळणार नाही. त्यामुळे आता युवा खेळाडूंना संधी द्यावी, असं मला वाटतेय. जगभरात होणाऱ्या टी 20 स्पर्धेत खेळण्याबाबत विचार करत आहे. 

भारतासाठी दोन कसोटी - 

शाहबाज नदीम यानं टीम इंडियासाठी दोन कसोटी सामने खेळले आहेत. 2019 ते 2021 यादरम्यान त्यानं दोन कसोटी सामने खेळलेत. चार डावात गोलंदाजी करताना त्यानं आठ विकेट घेतल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च कामगिरी 40 धावांच्या मोबदल्यात चार विकेट अशी राहिली आहे. 2019 मध्ये रांची कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकाविरोधात त्यानं पदार्पण केले. त्यानं दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना इंग्लंडविरोधात फेब्रुवारी 2021 रोजी चेन्नईमध्ये खेळला. 

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 542 विकेट 

झारखंडसाठी खेळणाऱ्या शाहबाज नदीम यानं 140 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. या सामन्यात त्यानं 28.86 च्या सरासरीने 542 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्यानं 7/45 सर्वोच्च कामगिरी केली आहे. त्याशिवाय 191 डावात फलंदाजी करताना त्यानं 2784 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं 2 शतकं आणि 8 अर्धशतकं ठोकली आहेत.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला...
लढाई एकतर्फी होणार नाही, टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा नेमंक काय म्हणाला?
Team India : भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये टी 20  नंतर वनडे मालिका गमावली,  तीन खेळाडूंसाठी टीमची दारं बंद?
भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये वनडे मालिकेत पराभव, तीन खेळाडूंसाठी भारताची दारं बंद
Rohit Sharma Ind Vs Eng ODI: मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं

व्हिडीओ

Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar and Ajit Pawar : 'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
Amitabh Bachchan Shares Health Update: अमिताभ बच्चन यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया; स्वतः बिग बींनी दिली हेल्थ अपडेट, म्हणाले, 'रिकव्हरीचा काळ खूप कठीण...'
अमिताभ बच्चन यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया; ICU मध्ये केलेलं दाखल, बिग बींना नेमकं झालंय तरी काय?
Uddhav Thackeray Abhijeet Dipke CJP Protest Delhi Jantar Mantar: जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
Ajit Pawar and Sunetra Pawar: रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
Actress Purva Kaushik Emotional On CJP Protest: 'हेल्पलेस फील होतंय, माणसाची किंमत इतकी कमीय, माहीत नव्हतं'; विद्यार्थ्यांवरचा लाठीचार्ज पाहून मराठी अभिनेत्री हादरली, VIDEO
'हेल्पलेस फील होतंय, माणसाची किंमत इतकी कमीय, माहीत नव्हतं'; विद्यार्थ्यांवरचा लाठीचार्ज पाहून मराठी अभिनेत्री हादरली, VIDEO
Rahul Gandhi: एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
Ajit Pawar and Sunetra Pawar: अजित पवारांचं विमान जिथे कोसळलं, त्याचठिकाणी आज सुनेत्रा पवार पोहोचल्या अन् ती जागा एकटक पाहत बसल्या, VIDEO
अजित पवारांचं विमान जिथे कोसळलं, त्याचठिकाणी आज सुनेत्रा पवार पोहोचल्या अन् ती जागा एकटक पाहत बसल्या, VIDEO
Embed widget