ऑस्ट्रेलियात येत्या आक्टोबर- नोव्हेबर
महिन्यात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी
आयसीसीनं अंतिम 16 संघांची
यादी जाहीर केलीय. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया (Australi), अफगाणिस्तान (Afghanistan), बांगलादेश (Banglades), इंग्लंड (England), भारत (India), नामिबिया
(Namibia), न्यूझीलंड
(New Zealand), पाकिस्तान
(Pakistan), स्कॉटलंड
(Scotland), दक्षिण
आफ्रिका (South Africa), श्रीलंका
(Sri Lanka), वेस्ट
इंडिज (West Indies), आयर्लंड
(Ireland) आणि
यूएईनं (United Arab Emirates) आधीच
आपलं स्थान निश्चित केलं होतं. त्यानंतर आता नेदरलँड्स आणि झिम्बाब्वे या दोन्ही
संघांनी क्वालिफायर टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत पोहोचून टी-20 विश्वचषकात 2022 मध्ये आपली जागा पक्की केलीय.
कसा असेल ग्रुप?
ग्रुप 'ए' मध्ये
नामीबिया, श्रीलंका,
यूएई आणि नेदरलँड्सला जागा मिळाली आहे.
तर, ग्रुप
'बी' मध्ये आयर्लंड, स्कॉटलँड,
वेस्ट इंडीज आणि झिम्बॉब्वेनं स्थान
मिळवलं आहे. तसेच ग्रुप '1' मध्ये
अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया,
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांचा समावेश
करण्यात आला आहे. याशिवाय, ग्रुप
'ए' चा विजेता संघ आणि ग्रुप 'बी' चा
रनरअप संघाचा ग्रुप '1' मध्ये
समावेश करण्यात येईल. ग्रुप '2' मध्ये भारत, पाकिस्तान,
दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश यांचा
समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर ग्रुप 'बी' चा
विजेता संघ आणि ग्रुप 'ए'चा रनरअप संघ ग्रुप '2' मध्ये एन्ट्री करेल.
टी-20
विश्वचषकातील
सामने कुठे खेळवले जाणार?
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20
विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून
13 नोव्हेंबर
पर्यंत एकूण 46 सामने
खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड,
ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट,
मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9
आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले
जातील. तर, अंतिम
सामना 13 नोव्हेंबरला
मेलबर्नमध्ये खेळला जाईल.
टी-20
विश्वचषक
2022 मधील
बक्षीस रक्कम
आस्ट्रेलिया पुढच्या महिन्यापासून
रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाला
अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, आयसीसीनं मोठ्या स्पर्धेसाठी बक्षीस रक्कमेची यादी जाहीर
केलीय. या स्पर्धेत एकूण 5.6 दशलक्ष
बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे 45.66 कोटी इतकी आहे. या स्पर्धेतील विजेता
संघाला 1.6 मिलियन
म्हणजेच जवळपास 13 कोटी
रुपये मिळतील. तर, रनरअप
संघाला सुमारे 6.5 कोटी
रुपयांचं बक्षीत दिलं जाईल. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत होणाऱ्या संघासाठी
4 लाख
यूएस डॉलर दिले जातील. तर, सुपर
12 मधून
बाहेर पडलेल्या 8 संघांमधील
प्रत्येक संघाला 7 हजार
अमेरिकन डॉलर्स मिळणार आहेत.