(Source: Poll of Polls)
Sandeep Patil MCA Election : 'मी जोवर आहे, तोवर मुंबई क्रिकेटसाठी काम करेन', एमसीए निवडणुकीत पराभवानंतर संदीप पाटील यांची प्रतिक्रिया
MCA Election : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत माजी क्रिकेटर संदीप पाटील अवघ्या 23 मतांनी अमोल काळे यांच्याकडून पराभूत झाले असून एक खेळाडू असल्याने त्यांनी खेळकर वृत्तीने हा पराभव स्वीकारला.
Mumbai Cricket Association Election 2022 : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचे (Mumbai Cricket Association Election) निकाल आता समोर आले असून अमोल काळे (Amol Kale) एमसीएचे नवे अध्यक्ष म्हणून समोर आले आहेत. त्यांनी विश्वचषक विजेते माजी कसोटीवीर संदीप पाटील (Sandeep patil) यांना पराभूत केलं आहे. काळे यांना 183 तर संदीप पाटील यांना 158 मतं मिळाली आहेत. दरम्यान पराभवानंतर संदीप पाटील यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत अगदी खेळकर वृत्तीने पराभव स्विकारत मी या पुढेही संधी मिळेल तेव्हा मुंबई क्रिकेटसाठी काम करेन अशी प्रतिक्रिया दिली आहे.
एका क्रिकेटरविरुद्ध निवडणुकीत सर्व राजकारणी एकत्र येतात तेव्हा कसं वाटतं? या प्रश्नाचं उत्तर देताना पाटील म्हणाले, 'सर्व राजकारणी एकत्र आले याचा मला आनंद आहे, माझ्याविरुद्ध निवडणुकीसाठी का होईना, ते एकत्र आले हे चांगलं आहे. ते असेल एकत्र राहावे आणि मुंबई क्रिकेटसाठी चांगलं काम करावं. तसंच क्रिकेट महत्त्वाचं आहे संदीप पाटील नाही.'' अशी प्रतिक्रिया देत क्रिकेटप्रती खासकरुन मुंबई क्रिकेटसाठी संदीप पाटील यांना किती आपुलकी आहे, हे त्यांनी दाखवून दिलं.'' तसंच त्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत मुंबई क्रिकेटसाठी मी जोवर हयात आहे तोवर काम करेन अशी प्रतिक्रियाही दिली.
विजयी उमेदवार
पवार-शेलार पॅनलचे उमेदवार अमोल काळे निवडून आले असून त्यांना 183 मतं मिळाली दुसरीकडे संदीप पाटील यांना मात्र 158 मतं मिळाल्याने ते थोडक्यात पराभूत झाले आहेत. याशिवाय सचिव म्हणून अजिंक्य नाईक 286 मतांनी निवडून आले असून मयांक खांडवाला (35) आणि नील सावंत (20) यांना त्यांनी मागे टाकलं आहे. खजिनदार म्हणून अरमान मलिक 162 मतांनी आघाडीवर असून जगदीश आचरेकर यांना 161 मतं मिळाली आहेत. पण केवळ एका मताचा फरक असल्याने पुनर्मोजणी होणार आहे. तर गणेश अय्यर 213 मतांसह कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडून आले असून मलिक मर्चंट (123) यांना त्यांनी मात दिली आहे. निवडून आलेल्या उमेदवारांची अपेक्स बॉडी पुढील प्रमाणे-
- मिलिंद नार्वेकर
- नीलेश भोसले
- अभय हडप
- समद सूरज
- जितेन्द्र आव्हाड
- मंगेश साटम
- संदीप विचारे
- प्रमोद यादव
हे देखील वाचा-
MCA Election 2022 : पवार-शेलार पॅनलकडून अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळालेले अमोल काळे आहेत तरी कोण?