एक्स्प्लोर

Salim Durani Passes Away : टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचं निधन, पहिल्या अर्जुन पुरस्काराचे मानकरी

Salim Durani Death : टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचं निधन झालं आहे. त्यांनी भारतीय संघासाठी एकूण 29 कसोटी सामने खेळले आहेत.

Former Indian Cricketer Salim Durani Death : भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी (Salim Durani) यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अफगाणिस्तानातून येऊन भारताकडून क्रिकेट खेळणारे दिग्गज क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. 2 एप्रिल रोजी गुजरातमधील जामनगर येथे त्यांचं निधन झालं आहे. सलीम दुर्राणी हे पहिले भारतीय क्रिकेटपटू होते, ज्यांचा अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला. भारतीय संघासाठी, त्यांनी एकूण 29 कसोटी सामने खेळले आणि त्यात 1202 धावा केल्या. या 1202 धावांमध्ये एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी 75 विकेट्सही घेतल्या आहेत.

काबूलमध्ये जन्म, नंतर कराचीमध्ये स्थायिक 

भारतीय क्रिकेट संघात सामील होऊन नाव कमावणारे फिरकीपटू असलेले अष्टपैलू सलीम दुर्रानी यांचा जन्म 11 डिसेंबर 1934 रोजी झाला. त्याचा जन्म अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे झाला होता. परंतु, काही काळानंतर दुर्रानी कुटुंब 8 महिन्यांच्या सलीमला घेऊन पाकिस्तानातील कराची येथे गेले आणि तिथेच स्थायिक झाले. मात्र, भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर दुर्रानी कुटुंब भारतात आले. त्यानंतर सलीम भारतातच लहानाचे मोठे झाले.

अजुर्न पुरस्काराचे मानकरी ठरलेले पहिले क्रिकेटपटू

भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांच्या निधनाने भारतीयांवर शोककळा पसरली आहे. दुर्राणी हे दीर्घकाळ आजारी होते. त्यांची कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज सुरु होती. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील जामनगरमध्ये सलीम दुर्राणी यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सलीम दुर्राणी अर्जुन पुरस्कार मिळवणारे पहिले क्रिकेटपटू आहेत. 1960 मध्ये त्यांना क्रीडा जगतातील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

13 वर्ष टीम इंडियाकडून क्रिकेट खेळलं

काबूलमध्ये जन्मलेल्या सलीम दुर्रानी यांनी 1 जानेवारी 1960 रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतासाठी पहिला कसोटी सामना खेळला होता. हा त्याचा पदार्पणाचा सामना होता. दुर्रानी यांनी जवळपास 13 वर्ष भारताकडून क्रिकेट खेळलं आहे. यादरम्यान, त्यांनी 29 कसोटी सामन्यांमध्ये 25.04 च्या सरासरीनं फलंदाजी करत 1202 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने आपल्या बॅटनं त्यांनी 1 शतक आणि 7 अर्धशतकं झळकावली आहेत. 

सलीम दुर्रानी यांची एक खासियत

सलीम दुर्रानींची एक खासियत म्हणजे, ते चाहत्यांच्या मागणीनुसार षटकार ठोकत असत. याशिवाय सलीम यांनी गोलंदाजीतही नाव कमावलं आहे. त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 75 विकेट्सही घेतल्या आहेत. डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून सलीम यांची ख्याती होती. सलीम दुर्रानी यांनी केवळ कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांनी शेवटची कसोटी 06 फेब्रुवारी 1973 रोजी इंग्लंडविरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळली होती.

बॉलिवूडमध्येही आजमावलं नशीब 

भारतीय क्रिकेट संघातील सर्वात हँडसम प्लेयर म्हणून सलीम दुर्रानी प्रसिद्ध होते. अनेक तरुणांच्या गळ्यातील ते ताईत होते. सलमी यांनी बॉलिवूडमध्येही आपलं नशीब आजमावलं आहे. सलीम दुर्रानी त्याच्या जबरदस्त लुक्ससाठीही ओळखले जात होते. त्यांनी बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे. 1973 मध्ये सलीम यांनी 'चरित्र' नावाच्या चित्रपटात काम केलं. त्या चित्रपटात दुर्रानी यांनी तेव्हाच्या स्टार अभिनेत्री परवीन बाबी यांच्यासोबत काम केलं होतं. याशिवाय सलीम यांना 2011 मध्ये बीसीसीआयकडून सीके नायडू जीवनगौरव पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटेZero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावलाZero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Embed widget