एक्स्प्लोर

Sachin Tendulkar Birthday : एअरपोर्टवर पहिली भेट, पहिल्या भेटीतच जडलं प्रेम, अशी आहे सचिन तेंडुलकरची फिल्मी लव्हस्टोरी

Sachin Anjali Love Story : महान भारतीय माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा आज 50 वा वाढदिवस आहे. मास्टर ब्लास्टर पहिल्याच भेटीत अंजलीच्या प्रेमात पडला होता. त्याने 1995 साली अंजलीशी लग्नगाठ बांधली.

Sachin Tendulkar 50th Birthday : महान भारतीय माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा आज 50 वा वाढदिवस आहे. मास्टर ब्लास्टरने आयुष्यातील 'हाफ सेंचुरी' पूर्ण केली आहे. सचिनच्या या प्रवासात त्याला पत्नी अंजलीने साथ दिली. सचिनच्या क्रिकेटमधील प्रवासाप्रमाणेच त्याचा प्रेमाचा प्रवासही फार रंजक आहे. सचिनने 1995 साली अंजलीसोबत लग्न केलं. या दोघांची पहिली भेट विमानतळावर झाली होती. विमानतळावर झालेल्या पहिल्या भेटीतच सचिनच अंजलीवर प्रेम जडलं होतं. या दोघांची प्रेमकहाणी फिल्मी लव्हस्टोरीप्रमाणे आहे. 

अशी झाले सचिन आणि अंजलीची पहिली भेट

सचिनच्या पत्नीचं नाव अंजली आहे. अंजली आणि सचिन यांच्या वयात बरंच अंतर आहे. अंजली सचिनपेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे पण, याचा त्यांच्या नात्यावर कोणताही परिणाम झाला नाही. सचिन आणि अंजली पहिल्यांदाच विमानतळावर एकमेकांना भेटले होते. दोघेही पहिल्या नजरेतच एकमेकांच्या प्रेमात पडले. पहिल्या भेटीत दोघांमध्ये काहीही बोलणं झालं नाही तर फक्त नजरा नजर झाली. अंजलीच्या कॉमन फ्रेंडने तिला सचिन क्रिकेटर असल्याचं सांगितलं.

सचिन इंग्लंड दौऱ्यावरून परतताना घडलं असं...

सचिन इंग्लंड दौऱ्यावरून परतत असताना विमानतळावर अंजलीला पहिल्यांदा भेटला. ही भेट तशी भेट नव्हती, कारण दोघांमध्ये काहीही संवाद झाला नाही. अंजली तिच्या आईला घेण्यासाठी विमानतळावर गेली होती. या नजरा-नजरीच्या पहिल्या भेटीनंतर दोघेही एका पार्टीत एकमेकांना भेटले. या पार्टीत दोघांचं पहिल्यांदा बोलणं झालं.

हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात

अंजली अभ्यासात फार हुशार होती आणि मेडिकलची विद्यार्थिनी होती. त्यामुळेच तिला क्रिकेटबद्दल फारशी माहिती नव्हती. पण, सचिनला भेटल्यानंतर अंजलीचा क्रिकेटमधील रस वाढला आणि तिने या खेळाबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली. दोघांची मैत्री वाढली. यानंतर हळुहळु दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि अखेर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी पाच वर्ष एकमेकांना डेट केलं. 

अंजली पत्रकार बनून गेली सचिनच्या घरी

या दोघांचं प्रेम दिवसेंदिवस खुलतं होतं. जेव्हा सचिनच्या घरी याबद्दल सांगण्याची वेळ आली. तेव्हाचा किस्सा फारच रंजक आहे. सचिनला अंजलीला घरच्यांना भेटवायचं होतं, पण प्रेम आहे हे सांगायचं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला सचिनने यासाठी कल्पना शोधली. त्यानं अंजलीला पत्रकार बनवून घरी नेलं. यावेळी अंजली कुर्ता-चुडीदार घालून सचिनच्या घरी पोहोचली होती.

सचिनच्या प्रसिद्धीमुळे दोघांना बाहेर फिरणं अवघड

सचिनचे चाहते दिवसेंदिवस वाढत होते, तर दुसरीकडे त्याचं आणि अंजलीचं प्रेम. सचिनच्या प्रसिद्धीनपळे दोघांनाही बाहेर फिरणं अवघड झालं होतं. अंजलीने एका कार्यक्रमात बोलताना याबद्दलचा एक किस्सा सांगितला होता. अंजलीने यावेळी सांगितलं होतं की, सचिन एकदा वेश बदलू तिच्यासोबत चित्रपटा पाहायला गेला होता. मात्र, चाहत्यांनी सचिनला ओळखलं आणि दोघांनाही चित्रपट पाहणं अर्धवट सोडूनच तेथून पळ काढावा लागला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातील उतारा वाचून दाखवला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
मराठी माणसांचा मुद्दा मांडला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
Raj Thackeray VIDEO: राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
F-1 Visa : 'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech :बीड ते तुर्की, मराठा ते वंजारी, हिंदू - मुस्लिम,शिवतीर्थवरील गाजलेले भाषणRaj Thackeray Speech : खालून प्रेत गेलं असेल एखादं...राज ठाकरंची तुफान फटकेबाजी ABP MAJHARaj Thackeray Speech : मुंबई पाच नद्या होत्या, चार मेल्या...मिठी नदी सुद्धा मरायला आली आहेRaj Thackeray Speech : कुंभमेळा, गंगा ते प्रदुषण...राज ठाकरेंचं सरकारवर पलटवार ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातील उतारा वाचून दाखवला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
मराठी माणसांचा मुद्दा मांडला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
Raj Thackeray VIDEO: राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
F-1 Visa : 'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
Indigo Airline: इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
Pragya Singh Thakur : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
Hemant Nimbalkar : कर्नाटकात नक्षलींचा बिमोड करणाऱ्या डॅशिंग 'कोल्हापूरकर' आयपीएस हेमंत निंबाळकरांना मुख्यमंत्री पदक
कर्नाटकात नक्षलींचा बिमोड करणाऱ्या डॅशिंग 'कोल्हापूरकर' आयपीएस हेमंत निंबाळकरांना मुख्यमंत्री पदक
Uk Visa Fee Hike : अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
Embed widget