ISPL 2nd Season : इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीग (ISPL) च्या पहिल्या हंगामातील यशानंतर आता लवकरच दुसरा हंगामा भरवण्याची तयारी होत आहे. पहिल्या हंगामात खचाखच भरलेल्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर कोलकाता टायगर्सने मुंबईचा १० गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले होते. आता 26 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दुसऱ्या हंगामाचा थरार रंगणार आहे.
रविवारी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) च्या दुसऱ्या हंगामाचे मुंबईत अनावरण करण्यात आले. त्यावेळी सचिन तेंडुलकर, बॉलीवूडचे सुपरस्टार सैफ अली खान आणि करीना कपूर खान उपस्थित होते. यावेळी क्रिकेटचा देव आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरने मुलींच्या टी-10 क्रिकेट बाबात मोठी घोषणा केली. सचिन इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) च्या कोअर कमिटीचा सदस्य आहे.
सचिन तेंडुलकर म्हणाला की, "माझ्यासाठी ISPL मधील सर्वात मोठी आठवण हीच आहे की, काश्मीर मधला तो मुलगा माझ्यासाठी इथे खेळायला आला, त्याचे टी शर्ट मी आणि माझे त्याने घातले होते, ती आठवण माझ्यासाठी खूप मोठी आहे.
पुढे तो म्हणाला की, या खेळात 50-50 चा एक नियम आहे, कारण काही टीम पुन्हा खेळत येण्यासाठी धडपडत असतात, त्या टीमला पुन्हा फॉर्म मध्ये आणण्यासाठी हा नियम बनवला गेला आहे. पण आता लवकरच या खेळात आम्ही मुलींना देखील घेणार आहोत, त्यामुळे आता फक्त हा खेळ मुलाचा नसेल.
तो शेवट म्हणाला की, मी स्वतः एका बाजूला टेप लावून टेनिस बोल ने प्रॅक्टिस करायचो, तोच नियम मी इथे पण आणला, हा थोडा अवघड निर्णय होता. काही लोकांना ते जमत नव्हते, पण नंतर नंतर जमायला लागले.
संबंधित बातमी :
WTC 2025 Final : भाऊ तयार झालं ना समीकरण! WTC फायनलमध्ये भारत-पाकिस्तान होणार सामना? जाणून घ्या गणित