Gabba Iconic Brisbane stadium : ब्रिस्बेनचे गाबा मैदान अनेक ऐतिहासिक कसोटी सामन्यांचे साक्षीदार राहिले आहे. आतापर्यंत येथे अनेक जबरदस्त कसोटी सामने खेळले गेले आहेत. इयान बोथमने आपली शेवटची शानदार खेळी येथे खेळली होती. स्वर्गीय शेन वॉर्ननेही आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्पेल येथेच टाकली होती. पीटर सिडलने वाढदिवसानिमित्त येथे हॅटट्रिक घेतली. याशिवाय 2021 च्या कसोटी मालिकेत भारताने येथे ऑस्ट्रेलियाला पराभूत करून इतिहास रचला होता. मात्र, आता गब्बा येथील कसोटी क्रिकेटचे भवितव्य धोक्यात आले आहे.


ईएसपीएन क्रिकइन्फोच्या मते, क्वीन्सलँड सरकारने क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत फक्त दोन वर्षांसाठी होस्टिंग करार केला आहे. याचा अर्थ भारताची आगामी कसोटी मालिका आणि पुढील वर्षी होणाऱ्या ॲशेस मालिकेनंतर गाबा येथे कसोटी सामने आयोजित करणे कठीण होणार आहे. यानंतर या मैदानावर कसोटी क्रिकेट कधी परतेल याची शकता कमी आहे.


ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड 2025-26 च्या ॲशेसमध्ये स्पर्धा करतील तेव्हा गाब्बा येथे हा सलग 49 वा कसोटी सामना असेल. मात्र, या मैदानावर कसोटी सामन्यांचे अर्धशतक होणाची शक्य कमी आहे. यानंतर कदाचित येथे कसोटी सामने होणार नाहीत. येथे इंग्लंडसोबत एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळवले जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे.


खरंतर, गाबा मैदानाचे आयुष्य 2030 पर्यंतच आहे. यानंतर 2032 मध्ये ब्रिस्बेनमध्ये ऑलिम्पिकही होणार आहे. पूर्वीपासून ते पूर्णपणे पुनर्बांधणी करण्याची योजना होती. मात्र, खर्च जास्त असल्याने हा आराखडा रखडला असून आता केवळ त्याचे नूतनीकरण होईल, अशी अपेक्षा आहे.


यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार ॲलन बॉर्डरनेही ऑलिम्पिकपूर्वी गाबा स्टेडियमचे नूतनीकरण करण्याची मागणी केली होती. ते म्हणाले होते की, गाबा क्रिकेट स्टेडियमबाबत सरकारकडे कोणतीही निश्चित योजना नाही, त्यामुळे गोष्टी व्यवस्थित होत नाहीत. तथापि, हे खूप दुःखदायक आहे. कारण 2032 च्या ऑलिम्पिकपर्यंत ते गाबाचा वापर कसा करू शकतात याबद्दल भविष्यात त्यांची निश्चित योजना असावी.



संबंधित बातमी :   


WTC 2025 Final : भाऊ तयार झालं ना समीकरण! WTC फायनलमध्ये भारत-पाकिस्तान होणार सामना? जाणून घ्या गणित

Kolkata Doctor Case : कोलकाता प्रकरणावरून सूर्यकुमार यादवांचा चढला पारा, थेट दिला इशारा! पोस्ट करत म्हणाला, तुमच्या मुलांना....


 इशान किशनचा डबल धमाका! धोनीसारखा षटकार मारून संघाला मिळवून दिला विजय; टीम इंडियात होणार एन्ट्री