Suryakumar Yadav Kolkata Doctor Murder Case : कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानंतर देशातील अनेक भागात निदर्शने होत आहेत. 


दरम्यान, अनेक क्रिकेटपटूंनीही प्रतिक्रिया दिल्या. टीम इंडियाचा टी-20 कर्णधार आणि अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादवनेही कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर मुलांना शिकवण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. सूर्याने इन्स्टाग्रामवर मेसेज शेअर केला आहे.


सूर्यकुमार यादवने इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये कोलकाता प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले की, "तुमच्या मुलांना शिक्षित करा." पण त्यावर सुर्याने कट मारला आहे. यानंतर त्यांनी लिहिले की, तुमचे भाऊ, तुमचे वडील, तुमचे पती आणि तुमच्या मित्रांना शिक्षित करा.'' सूर्यापूर्वी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही प्रतिक्रिया दिली होती. कोलकाता प्रकरणावर त्यांनी संताप व्यक्त केला होता.


सूर्यकुमार यादव लवकरच दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. भारतासाठीही त्याने चांगली कामगिरी केली आहे. सूर्याने टीम इंडियासाठी एक कसोटी सामना खेळला आहे. तर 37 एकदिवसीय सामने खेळले आहेत. सूर्याने या फॉरमॅटमध्ये 773 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 4 अर्धशतके झळकावली आहेत. 


टीम इंडियासाठी सूर्याने 71 टी-20 सामन्यात 2432 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 4 शतके आणि 20 अर्धशतके केली आहेत. सूर्याने 150 आयपीएल सामन्यात 3594 धावा केल्या आहेत. या लीगमध्ये 2 शतके आणि 24 अर्धशतके झळकावली आहेत.


आता सूर्या दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये सी संघाकडून खेळणार आहे. ऋतुराज गायकवाड या संघाचा कर्णधार असणार आहे. सूर्या आणि ऋतुराज सोबत टीम सी मध्ये साई सुदर्शन, रजत पाटीदार आणि उमरान मलिक हे देखील आहेत. दुलीप ट्रॉफीचा पहिला सामना पाच सप्टेंबरपासून अ आणि ब संघामध्ये खेळला जाणार आहे. टीम सी चा पहिला सामना टीम डी विरुद्ध होणार आहे.





 


संबंधित बातमी :


 इशान किशनचा डबल धमाका! धोनीसारखा षटकार मारून संघाला मिळवून दिला विजय; टीम इंडियात होणार एन्ट्री


Viral Video : 'लेडी बुमराह'चा कहर, तुफानी गोलंदाजीने उडवून दिली खळबळ; तुम्ही पाहिला का व्हिडिओ?


Pat Cummins : पॅट कमिन्सचा मोठा निर्णय! क्रिकेटमधून अचनाक घेतला ब्रेक; जाणून घ्या कारण