World Test Championship 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता सर्व संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या फायनलमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत.


सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत पहिल्या तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर पाकिस्तान सध्या सहाव्या स्थानावर आहे. पण चाहत्यांना अशी आशा आहे यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना बघायला मिळेल. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या समीकरणाने दोन्ही संघ अंतिम फेरीत आमनेसामने येऊ शकतात.


पाकिस्तानसाठी अवघड रस्ता


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानला अजून 9 कसोटी सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत 9 ते 7 सामने जिंकल्यास त्यांना थेट अंतिम फेरीत स्थान मिळेल. पाकिस्तान संघाने दोनपेक्षा जास्त कसोटी सामने गमावल्यास अंतिम फेरीत जाण्याच्या त्यांच्या आशा धुळीस मिळतील. याशिवाय जर पाकिस्तान संघाने 9 पैकी 6 सामने जिंकले. यामध्ये दोन सामने अनिर्णित राहिले आणि एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, तरीही ते अंतिम फेरीत प्रवेश करू शकतात. पण पाकिस्तानने दोन सामने गमावले आणि एक सामना अनिर्णित राहिला तर त्याला इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल.


भारतासाठी काय आहे समीकरणे


जर आपण भारताबद्दल बोललो तर संघाला अद्याप वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 10 सामने खेळायचे आहेत. जर टीम इंडियाने 7 सामने जिंकले तर ते फायनलमध्ये प्रवेश करेल. मात्र तीनपेक्षा जास्त सामने हरले तर टीम इंडियाचे फायनलमध्ये जाण्याचे स्वप्न भंग पावणार आहे.


जर टीम इंडियाने 10 पैकी 6 सामने जिंकले. दोन सामने अनिर्णित राहिले आणि दोन पराभूत झाले तरी भारताचा संघ अंतिम फेरीत जाईल. जर भारताने फक्त 5 सामने जिंकले. इतर 5 सामन्यांमध्ये भारताला 3 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आणि दोन सामने अनिर्णित राहिल्यास त्यांना अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी इतर संघांवर अवलंबून राहावे लागेल.


जर ही सर्व समीकरणे भारत आणि पाकिस्तानच्या बाजूने गेली, तर 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आपल्याला हा ड्रीम मॅच पाहायला मिळेल.


संबंधित बातमी :


Kolkata Doctor Case : कोलकाता प्रकरणावरून सूर्यकुमार यादवांचा चढला पारा, थेट दिला इशारा! पोस्ट करत म्हणाला, तुमच्या मुलांना....


 इशान किशनचा डबल धमाका! धोनीसारखा षटकार मारून संघाला मिळवून दिला विजय; टीम इंडियात होणार एन्ट्री