एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

SA vs NZ Match Highlights : किवीचे सपशेल लोटांगण, दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 190 धावांनी विराट विजय

SA vs NZ Match Highlights : पुण्यातील विश्वचषकाच्या (World Cup 2023) सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा (SA vs NZ) तब्बल 190 धावांनी दारुण पराभव केला.

SA vs NZ Report: पुण्यातील विश्वचषकाच्या (World Cup 2023) सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा (SA vs NZ) तब्बल 190 धावांनी दारुण पराभव केला. आफ्रिकेने दिलेल्या 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवी फलंदाजांची दमछाक उडाली. न्यूझीलंडचा संपूर्ण डाव 35.3 षटकात 167 धावांत संपुष्टात आलाय. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स याने एकाकी झुंज दिली. त्याने 50 चेंडूत 60 धावांची खेळी केली. फिलिप्सचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही.

डेवेन कॉनवे 2, विल यंग 33, रचिन रविंद्र 9, डॅरेल मिचेल 24, टॉम लेथम 4, मिचेल शँटनर 7, टीम साऊदी 7, जीमी नीशम 0 यांना मोठी खेळी करता आली नाही. या फलंदाजांनी सपशेल लोटांगण घेतले. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मार्को यानसन याने 3 विकेट घेतल्या. त्याशिवाय Gerald Coetzee याने दोन विकेट घेतल्या. तर रबाडाला एक विकेट मिळाली.

डिकॉकचे चौथे शतक, आफ्रिका पुन्हा 350 पार - 

पुण्याच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना सात विकेटच्या मोबदल्यात 357 धावांचा डोंगर उभारला. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लेथम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात संथ झाली. त्यात कर्णधार टेंबा बावूमा 24 धावा काढून तंबूत परतला. पण त्यानंतर क्विंटन डिकॉक आणि रासी वान डुर डुसैन याने मोठी भागिदारी केली. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 200 धावाचं भागादारी झाली. सलामी फलंदाज क्विंटन डिकॉक याने पुन्हा एकदा शतकी धमाका केला. क्विंटन डि कॉकने 116 चेंडूत 114 धावांची खेळी केली. या डावत त्याने 10 चौकार आणि तीन षटकार ठोकले. डिकॉकचे विश्वचषकातील हे चौथे शतक होय. त्याशिवाय रासी वान डुर डुसैन यानेही शतक ठोकले.  डुर डुसैन याने 118 चेंडूत 133 धावा केल्या. यामध्ये त्याने 9 चौकार आणि 5 षटकार ठोकले.  अखेरच्या षटकात डेविड मिलर याने वादळी फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. मिलरने 30 चेंडूत 53 धावा कुटल्या. यामध्ये दोन चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. क्विंटन डि कॉक याने विश्वचषकात चार शतके ठोकली आहेत. तर डुसेन याने दोन शतके ठोकली आहे. यंदाच्या विश्वचषकात डिकॉकने 500 धावांचा पल्ला पार केला आहे. विश्वचषकात सर्वाधिक धावा चोपणारा डिकॉक पहिला फलंदाज आहे. डिकॉकने सात सामन्यात 545 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक विकेट घेतल्या. 10 षटकात त्याने दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय ट्रेंट बोल्ट आणि जीमी नीशम याने प्रत्येकी एक एक विकेट घेतली.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईलJitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Embed widget