Happy Birthday Ruturaj Gaikwad: चेन्नई सुपर किंग्जचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड आज त्याच्या 25 वा वाढदिवस साजरा करीत आहे. भारतीय क्रिकेटमधील युवा आणि मराठमोळा चेहरा ऋतूराज गायकवाड आपल्या दमदार कामगिरीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या ऋतूराजनं अल्पावधीच आपली वेगळी छाप सोडलीय. आयपीएलच्या मागच्या हंगमात ऋतुराज गायकवाडनं उत्कृष्ट कामगिरी केलीय. ऋतुराजनं मागच्या हंगामात सर्वाधिक 635 धावा केल्या होत्या. याबाबत त्यानं विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीलाही मागं टाकलंय. 


ऋतुराज गायकवाड 2016 मध्ये त्याच्या करीअरची सुरुवात केली होती. त्यानं केदार जाधवच्या नेतृत्वाखाली झारखंडविरुद्ध महाराष्ट्राकडून रणजी सामना खेळला. या सामन्यात गायकवाड 15 धावा करून बाद झाला. त्यानं 2017 मध्ये लिस्ट ए चा पहिला सामना खेळला. त्यानंतर त्यानं देशांतर्गत सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्यास सुरुवात केली. त्यामुळं त्याला आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. गायकवाडनं या स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली.


आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या ऋतुराजला 2021 मध्ये भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. त्यानं जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. ऋतुराजनं आतापर्यंत 2 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.


ऋतुराजनं लिस्ट ए च्या 64 सामन्यात 3284 धावा केल्या आहेत. ऋतुराजनं या कालावधीत 11 शतके झळकावली आहेत. त्यानं 21 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 1 हजार 349 धावा केल्या आहेत. ऋतुराजनं आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केलीय. त्यानं आतापर्यंत एकूण 22 आयपीएलचे सामने खेळले आहे. ज्यात त्यानं 839 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha