IND vs WI, T20 Series: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज मालिकेला येत्या 6 फ्रेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन एकदिवसीय आणि तितक्याच टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. परंतु, टी-20 मालिकेत भारतासमोर वेस्ट इंडीजच्या पाच फलंदाजांचं मोठ आव्हान असणार आहे. नुकतीच वेस्ट इंडीजच्या संघानं इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकलीय. 5 सामन्याच्या मालिकेत वेस्ट इंडीजच्या संघानं 3-2 फरकानं मालिका जिंकली आहे. इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत वेस्ट इंडीजच्या खेळाडूंच पारड जड राहिलं. तर काही खेळाडूंची कामगिरी अप्रतिम होती.


15 ते 20 फेब्रुवारी दरम्यान भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाईल. या मालिकेसाठी वेस्ट इंडिजने तोच संघ निवडला आहे, ज्याने नुकतीच इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकलीय. अशा स्थितीत भारत आणि विंडीज यांच्यातील खेळण्यात येणारी टी-20 मालिका खूपच रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.


1) निकोलस पूरन:
 वेस्ट इंडिजचा हा यष्टिरक्षक फलंदाज इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. निकोलस पूरननं 5 सामन्यात 41 च्या सरासरीने 164 धावा केल्या.


2) रोव्हमन पॉवेल: 
वेस्ट इंडीजच्या या मधल्या फळीतील फलंदाजानं इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत 193 धावांच्या जोरदार स्ट्राइक रेटने जोरदार फलंदाजी केली. त्यानं 73.50 च्या सरासरीनं 147 धावा केल्या. वेस्ट इंडिज-इंग्लंड मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकावर होता.


3) जेसन होल्डर: 
वेस्ट इंडिजच्या या अष्टपैलू खेळाडूनं इंग्लंडविरुद्धच्या 5 टी-20 सामन्यात 144 धावांत 15 बळी घेतले. त्याची गोलंदाजीची सरासरी 9.60 होती. संपूर्ण मालिकेत तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता.


4) अकिल हुसेन: 
वेस्ट इंडिजच्या या फिरकीपटूनं इंग्लंडविरुद्धच्या 5 टी-20 सामन्यांमध्ये 120 धावांत 8 बळी घेतले. त्याची गोलंदाजीची सरासरी १५ होती. संपूर्ण मालिकेत तो दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.


5) किरॉन पोलार्ड:
 वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्डनं इंग्लंडविरुद्ध संपलेल्या मालिकेत शानदार अष्टपैलू कामगिरी केली. त्याने 5 सामन्यांच्या 4 डावात 3 वेळा नाबाद राहताना 69 धावा केल्या. यासोबतच त्याने 4 विकेट्सही घेतल्या.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha