Australian Open Final 2022 : स्पेनच्या राफेल नदाल (Rafael Nadal) याने ऑस्ट्रेलियन ओपनचा (Australian Open Final 2022) अंतिम सामना जिंकत आणखी एक ग्रँड स्लॅम (Grand Slam) खिशात घातलं आहे. त्याने इतिहासात सर्वाधिक म्हणजेच 21 ग्रँडस्लॅम मिळवले आहेत. टेनिसपटू राफेल नदालने अंतिम सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदवेदवला मात देत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच जेतेपद पटकावलं आहे. अतिशय अटीतटीचा झालेला सामना जवळपास पाच तासांहून अधिक काळ चालला. ज्यात पाच सेट्समध्ये राफेलने विजय मिळवला.
राफेलने 2-6, 6-7, 6-4, 6-4 आणि 7-5 अशा फरकाने विजय मिळवला. अंतिम सामन्यात रशियाच्या मेदवेदेवने सुरुवात तर उत्तम केली. त्याने पहिले दोन सेट्स जिंकले देखील पण अनुभवाच्या जोरावर अखेरचे तिनही सेट्स नदालने जिंकत जेतेपद पटकावलं आहे. या विजयासह नदालच्या खात्यात आता 21 ग्रँडस्लॅम जेतेपदे झाली आहेत. रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच यांच्या नावावर प्रत्येकी 20 ग्रँडस्लॅम असल्याने राफेलने एक नवा विश्वविक्रम केला आहे.
असा पार पडला सामना
ऑस्ट्रेलियन ओपनचा हा सामना एखाद्या अंतिम सामन्याला अगदी साजेशा झाला. सुरवातीपासून अखेरपर्यंत उत्कंठा वाढवणारा हा सामना राफेलने जिंकला असला तरी डॅनिल याचा खेळही उत्कृष्ट होता. सामन्यात पहिल्या सेटमध्ये डॅनेलने नदालला 6-2 अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. दुसरा सेटही डॅनेलने जिंकला पण यावेळी राफेलने कडवी झुंज दिल्यामुळे डॅनिलने 6-7 ने सेट जिंकला. तिसऱ्या सेटमध्येही डॅनेल जिंकेल असे वाटत असताना राफेलने कमबॅक करत अप्रतिम खेळ दाखवला आणि सेट 6-4 ने जिंकला. चौथा सेटही 6-4 ने जिंकल्यानंतर अखेरचा निर्णायक सेट राफेलने 7-5 ने खिशात घालत सामन्यासह स्पर्धा जिंकत इतिहास रचला.
हे देखील वाचा-
- AFC Women's Asian Cup : जपानचा थायलंडवर विजय; उपांत्य फेरीत धडक
- Women Asia Cup : तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात भारताची चीनवर मात, कांस्य पदकावर कोरलं नाव
- IND vs WI: जाडेजाला संघात स्थान का नाही? बीसीसीआयनं सांगितलं कारण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha