Ruturaj Gaikwad Birthday: भारताचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडचा आज 25 वर्षाचा झालाय. चेन्नई सुपर किंग्जनं आपल्या अधिकृत अकाउंटवरुन ऋतूराज गायकवाडला 25 व्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्यात. भारतीय क्रिकेटमधील युवा आणि मराठमोळा चेहरा ऋतूराज गायकवाड आपल्या दमदार कामगिरीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या ऋतूराजनं अल्पावधीच आपली वेगळी छाप सोडलीय.
ऋतुराज गायकवाडचा जन्म 31 जानेवारी 1997 मध्ये पुण्यात झाला होता. ऋतुराज हा मोठ्या खेळीसाठी ओळखला जातो. गेल्या 1 वर्षात त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक शतके झळकावली आहे. याच कारणामुळे त्याला टीम इंडियात संधी तर मिळालीच पण आता तो महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा स्टार खेळाडूही बनला आहे. ऋतुराजनं गेल्या वर्षी श्रीलंकाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आणि विजय हजारे ट्रॉफीत त्यानं धावांचा पाऊस पाडला. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरही ऋतुराज गायकवाडची भारतीय एकदिवसीय संघात निवड झाली होती. परंतु, या दौऱ्यावर त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच येत्या 6 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आलीय. या मालिकेत त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
वयाच्या सहाव्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात
ऋतुराज गायकवाडनं वयाच्या सहाव्या वर्षापासून क्रिकेटर बनण्याचा प्रवास सुरु केला होता. 2003 मध्ये पुण्यात खेळण्यात आलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात ब्रॅडन मॅक्कलमनं आक्रमक खेळी केली होती. ऋतुराज गाडकवाड त्याच्या वडिलांसह हा सामना पाहत होता. त्यावेळी ऋतुराजला मॅक्कलमसारखा फलंदाज बनवण्याची त्याच्या वडिलांच्या मनात इच्छा निर्माण झाली. त्यानंतर ऋतुराज गायकवाडला भारताचा माजी फलंदाजी दिलीपी वेंगसकर यांच्या अॅकडमीमध्ये दाखल केलं.
महेंद्रसिंह धोनीचं मार्गदर्शन
ऋतुराजनं 2014 मध्ये 17 व्या वर्षी कूचबिहार ट्रॉफीमध्ये 11 डावात 826 धावा केल्या. यानंतर 2015 च्या मोसमातही त्यानं धावा केल्या. 2016 मध्ये त्याने प्रथम श्रेणीत पदार्पण केलं. त्याच वर्षी झारखंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेंडू आदळल्यामुळे त्याचे बोट फ्रॅक्चर झालं. तेव्हा महेंद्रसिंग धोनी झारखंड संघाचा मार्गदर्शक होता. दुखापतीमुळं ऋतुराजला सामन्यात उतरता आले नाही आणि त्याची निराशा झाली. मग धोनीने स्वत: त्याच्या प्लास्टरवर ऑटोग्राफ देऊन त्याला प्रोत्साहन दिले होतं. आपल्या कारकिर्दीत अनेकवेळा अशा दुखापतींना सामोरे जावे लागू शकते, याचा धडा दिला.
हे देखील वाचा-
- IND Vs WI: विश्वविक्रम! टीम इंडिया खेळणार 1000 वा एकदिवसीय सामना, रोहित शर्माच्या नेतृत्वात संघ उतरणार मैदानात
- IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा 'बॅक अप प्लॅन' तयार
- ...तर सचिन तेंडुलकरने 1 लाखांहून अधिक धावा केल्या असत्या, शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha