Rohit Sharma: एका पुरस्कार सोहळ्यासाठी भारताच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा देखील उपस्थित होता. या कार्यक्रमदरम्यानचा रोहित शर्माचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानाच्या आत असो की बाहेर, त्याची मजेशीर शैली नेहमीच पाहायला मिळते. कधी त्याचा आवाज स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड होतो, तर कधी त्याच्या काही मजेदार कृती कॅमेऱ्यात कैद होतात. यावेळीही असेच काहीसे घडले. रोहित शर्माचे एक मजेदार कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.


नेमकं व्हिडीओमध्ये काय?


रोहित शर्मा या व्हिडिओमध्ये एका खुर्चीवर बसलेला आहे. रोहित शर्मा सुरुवातीला आपल्या शर्टाची कॉलर ठीक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित आपली कॉलर थोडी फोल्ड करत आहे. हे करताना रोहित थोडासा वैतागलेला दिसत आहे. कारण ही गोष्ट त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर रोहित शर्मा काहीतरी अपशब्द बोलतो आणि त्याचवेळी तो मागे वळून बघतो, तर कोणीतरी त्याचा व्हिडीओ काढत असतो. त्यामुळे मोबईल पाहताच रोहित शर्मा त्याला सॅल्यूट करतो. 






तीन जणांना दिले विश्वचषक विजयाचे श्रेय-


रोहित शर्माने या कार्यक्रमात टी- 20 विश्वचषकाच्या विजयावरही भाष्य केलं. भारतीय कर्णधार रोहित शर्माने विजयाचे श्रेय देताना तीन खास नावे घेतली. हिटमॅनने सांगितले की, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी मिळविण्याच्या त्याच्या प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा दिला होता.


रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार 


रोहित शर्माला सीएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्समध्ये पुरूषांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयरचा किताब देण्यात आला. रोहित शर्माला त्याची उत्कृष्ट फलंदाजी आणि उत्कृष्ट कर्णधार म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. 






श्रेयस अय्यरचाही व्हिडीओ आला समोर-


या कार्यक्रमादरम्यानचा रोहित आणि श्रेयस अय्यरचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. तर झाले असे की, या पुरस्कार सोहळ्यासाठी रोहित शर्मा थोड्या उशिराने पोहोचला, श्रेयस अय्यर तिथे आधीच उपस्थित होता. रोहित दिसताच श्रेयसने जागेवरून उठून त्याला स्वतःची खुर्ची देऊ केली. मात्र, मोठ्या मनाच्या रोहितने त्याला समोरची खुर्ची देत स्वतः मागे बसला. यानिमित्ताने भारतीय कर्णधाराचा संघ सहकाऱ्यांना किती आदर आहे, याची प्रचिती आली.


संबंधित व्हिडीओ-


वडील भारताकडून क्रिकेट खेळले, आता मुलगा इंग्लंडच्या संघात; कोण आहे हॅरी सिंग?