आता रोहितकडून श्रेयस अन् ईशानची अप्रत्यक्ष कानउघडणी! बीसीसीआयने दिला होता दणका
Rohit Sharma PC India vs England Test : आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसेल तर प्रत्येकाला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावच लागेल. याबाबत बीसीसीआय आणि कोच राहुल द्रविड यांनी कठोर भूमिका घेतली आहे
Rohit Sharma PC India vs England Test : आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसेल तर प्रत्येकाला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावच लागेल. याबाबत बीसीसीआय (BCCI) आणि कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी कठोर भूमिका घेतली आहे. रोहित शर्मानेही पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमधील मुद्दा मांडत युवा आणि अनुभवी खेळाडूंना इशारा दिलाय. देशांतर्गत क्रिकेट हे मूळ आहे, त्यामुळे प्रत्येकाला देशांतर्गत क्रिकेट खेळावेच लागेल, असं वक्तव्य रोहित शर्माने केले आहे. तो धर्मशालामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होता.
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये (IND vs ENG) सात मार्च रोजी मालिकेतील अखेरचा सामना होणार आहे. धर्मशालामध्ये दोन्ही संघाने कसून सराव केला. सामन्याच्या आधी भारताचा कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) पत्रकार परिषद पार पडली.
देशांतर्गत क्रिकेट खेळावेच लागेल -
बीसीसीआयने सध्या भारतीय खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळावच याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळल्यामुळे बीसीसीआयने नुकतेच ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना केंद्रीय करारातून वगळलं. रोहित शर्मानेही देशांतर्गत क्रिकेट खेळावेच लागेल, असं वक्तव्य केलेय. रोहित शर्मा म्हणाला की, "मेडिकल टीमने प्रमाणपत्र देईपर्यंत प्रत्येक खेळाडूला देशांतर्गत क्रिकेट खेळावच लागेल. सर्वांसाठी हे महत्वाचं आहे. मुंबई आणि तामिळनाडू यांच्यातील रणजी स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना पाहिला. देशांतर्गत क्रिकेट आपलं मूळ आहे, त्याला महत्व देणं गरजेचं आहे."
Rohit Sharma said "Players need to play domestic cricket unless their medical team has given a certificate - it's important, it's for everyone. I saw the Mumbai vs Tamil Nadu game, it's crucial to give importance to domestic cricket which is the core". [Press by Devendra Pandey] pic.twitter.com/VS3I7P1hPx
— Johns. (@CricCrazyJohns) March 6, 2024
रजत पाटीदारला पुन्हा संधी मिळणार, रोहित शर्मानं दिले संकेत
इंग्लंडविरोधात कसोटी सामन्यात भारताकडून चार खेळाडूंनी पदार्पण केले. त्यामध्ये सरफराज खान, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल आणि आकाशदीप यांचा समावेश आहे. रजत पाटीदार वगळता इतरांनी चमकदार कामगिरी केली. रजत पाटीदारला तीन सामन्यात अद्याप मोठी खेळी करता आली नाही, त्याला एकही अर्धशतक ठोकता आले नाही. अखेरच्या कसोटी सामन्यात पाटीदारला वगळलं जाणार असल्याची चर्चा सुरु होती. पण रोहित शर्माने रजत पाटीदारला संधी मिळण्याचे संकेत दिले आहेत. रोहित शर्मा म्हणाला की, "रजत पाटीदार शानदार आणि प्रतिभाशाली खेळाडू आहे. त्याच्यामध्ये खूप क्षमता आहे. त्याला आणखी काही संधी आणि वेळ देण्याची गरज आहे. "
ऋषभ पंतचा खेळ पाहिला नाही वाटतेय, साहेबांना रोहित शर्माची चपराक
यशस्वी जायस्वालची फलंदाजी पाहून इंग्लंडच्या बेन डकेट यानं एक वक्तव्य केले होते. तो म्हणाला होता की, यशस्वी जायस्वाल कसोटीमध्ये ज्या पद्धतीने आक्रमक खेळत आहे, त्याचं श्रेयस इंग्लंडला जायला पाहिजे. बेन डकेट यानं यशस्वीबद्दल केलेल्या वक्तव्यावर रोहित शर्माला प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी रोहित शर्माने पंतचे उदाहरण दिलं. रोहित शर्मा म्हणाला की, "भारतीय संघात ऋषभ पंत नावाचा खेळाडू होता. बेन डकेट यानं त्याची फलंदाजी पाहिली नाही का ? " रोहित शर्माने बेन डकेट याला ऋषभ पंत याच्या आक्रमक फलंदाजाची आठवण करुन दिली. पंत याने कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजी करत अल्पवधीतच नाव कमावलेय. तो आता कमबॅकसाठी सज्ज झालाय. पंत आयपीएलमधून क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक करण्यास सज्ज झालाय.