Ind vs Ban Test Series : भारतीय संघ 19 सप्टेंबरपासून मायदेशात बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. टीम इंडिया चेन्नईमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सराव करत आहे. मात्र, मालिका सुरू होण्याच्या दोनच दिवस आधी भारतीय कर्णधार रोहित शर्माने चेन्नईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भविष्याविषयी चर्चा केली.
रोहित शर्माचं मोठं वक्तव्य
बांगलादेश मालिकेपूर्वी रोहित शर्मा आपल्या रणनीतीबद्दल मोकळेपणाने बोलला. पण यादरम्यान रोहितने मोठं वक्तव्य केलं आहे. आपल्या परिषदेदरम्यान हिटमॅन म्हणाला, 'आज सर्व देशांना भारतीय संघाचा पराभव करायचा आहे. प्रत्येक संघाला भारताला हरवून आनंद मिळतो. पण आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आम्हाला सामना जिंकायचा आहे. आपला विरोधी संघ आपल्याबद्दल काय विचार करत आहे याचा आपण विचार करू शकत नाही. त्यांची विचारसरणी काय आहे? इंग्लंडही भारतात आले तेव्हा त्यांनीही त्यांच्या पत्रकार परिषदेत आमच्याबद्दल बोलले. पण आम्ही त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. रोहितच्या वक्तव्यामुळे सर्व देशांना भारताविरुद्ध चांगली कामगिरी करायची आहे, हे स्पष्ट झाले आहे.
बांगलादेशविरुद्ध वरिष्ठ खेळाडूंशिवाय युवा खेळाडूंनाही स्थान देण्यात आले आहे. सरफराज खान, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जैस्वाल यांनाही संधी देण्यात आली आहे. या खेळाडूंनी इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केली होती.
अशा परिस्थितीत रोहितने पत्रकार परिषदेत या खेळाडूंचे भरभरून कौतुक केले. या खेळाडूंमध्ये भारतासाठी धावा करण्याची भूक आहे, असे रोहितचे मत आहे. मात्र, बांगलादेशविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये या खेळाडूंना संधी मिळते की नाही हे येणारा काळ ठरवेल.
हे ही वाचा -
चेहऱ्यावर मास्क, हातात चीनचा झेंडा; भारताविरुद्ध चीनला पाठिंबा, पाकिस्तानी हॉकी संघाचा फोटो व्हायरल