India vs China Final Asian Champions Trophy 2024 : हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना भारत आणि चीन यांच्यात खेळला जात आहे. चीनने पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे, तर टीम इंडिया पाचव्यांदा जेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. पाकिस्तानने दक्षिण कोरियाचा 5-2 असा पराभव करून स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले. मात्र आता पाकिस्तानी खेळाडूंचे भारताला विरोध करण्याचे फोटो समोर आले आहे.
खरं तर, मोकी हॉकी ट्रेनिंग बेस स्टेडियमवर भारत आणि चीन यांच्यातील अंतिम सामना खेळण्यापूर्वी त्याच मैदानावर पाकिस्तान-कोरिया सामना झाला होता. सामना संपल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू चाहत्यांमध्ये खुर्च्यांवर बसलेले दिसले. जेथे पाकिस्तानी खेळाडू चीनचा झेंडा फडकावताना दिसले. गेल्या रविवारी भारत-पाकिस्तान सामना झाला तेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये हाणामारी झाल्याची घटनाही घडली होती.
या कृत्याबद्दल भारतीय चाहते विशेषतः पाकिस्तानी खेळाडूंवर जोरदार टीका करत आहेत आणि ट्रोल करत आहेत. पाकिस्तानचा संपूर्ण देश चीनच्या तालावर नाचतो म्हणून पाकिस्तानकडून यापेक्षा जास्त अपेक्षा करणे चुकीचे आहे असे कोणी म्हणत आहे. तर कोणी याला पूर्णपणे खेळाच्या भावनेविरुद्ध म्हटले आहे. भारतीय चाहते पाकिस्तान संघावर सर्व बाजूंनी टीका करत आहेत.
भारत-पाक सामन्यात झाली होती हाणामारी
हॉकीमध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 लक्षात राहील. कारण या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये भांडण झाले होते. खरं तर, भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान, पाकिस्तानी खेळाडू राणा वाहिद अश्रफने भारताच्या जुगराजला टॅकल केले, ज्यामुळे जुगराज वेदनेने ओरडताना दिसला. यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू आमनेसामने आले. जर्मनप्रीत सिंग लढायला तयार होता, पण अंपायरने हस्तक्षेप करू वातावरण शांत केले.
हे ही वाचा -
ICCची मोठी घोषणा, टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा संघ होणार श्रीमंत, उपविजेत्या संघावरही पडणार पैशांचा पाऊस
युरोपीयन तरुणींची नीरज चोप्रासोबत फोटो काढण्यासाठी धडपड; सेल्फीनंतर नंबरही मागितला, Video