ICC Announces Prize Money for Womens T20 World Cup 2024 : महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार तीन ऑक्टोबरपासून रंगणार आहे. आयसीसीने 2024 च्या वर्ल्ड कपच्या यजमानपदाची जबाबदारी UAE ला दिली आहे. पहिला सामना तीन ऑक्टोबरला होणार आहे. पहिला सामना बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यात शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. 


मात्र, यादरम्यान आयसीसीने एक मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने चॅम्पियन संघ आणि उपविजेता संघाला किती रक्कम मिळणार हे जाहीर केले आहे. पूर्वीच्या तुलनेत बक्षीस रकमेत 225 टक्के वाढ झाली आहे.


आयसीसीनं केलं घोषणा!


आयसीसीने जेतेपद पटकावणाऱ्या संघाला 2 लाख 34 हजार अमेरिकन डॉलर्स देण्याची घोषणा केली आहे. तर उपविजेत्या संघाला 1 लाख 70 हजार डॉलर्स मिळतील. याशिवाय उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या संघाला 6 लाख 75 हजार अमेरिकन डॉलर्स मिळतील. ग्रुप स्टेजमध्ये सहभागी होणाऱ्या संघाला 31 हजार 154 डॉलर्स मिळतील.


आयसीसीने वाढवली बक्षीस रक्कम


आयसीसीने बक्षीस रकमेत पूर्वीच्या तुलनेत 225 टक्क्यांनी वाढ केली आहे. याशिवाय जेतेपद विजेत्या संघाला पूर्वीपेक्षा 134 टक्के अधिक रक्कम देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याच वेळी, उपविजेत्या संघाला पूर्वीपेक्षा 134 टक्के अधिक पैसे मिळतील. उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या संघाला 221 टक्के अधिक पैसे मिळतील. त्याच वेळी, गट टप्प्यात सहभागी होणाऱ्या संघांच्या संख्येत 78 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


भारतीय महिला संघ 4 ऑक्टोबरला पहिला सामना खेळणार आहे, जिथे तिचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. आयसीसीने 2024 च्या टी-20 महिला वर्ल्ड कपच्या यजमानपदाची जबाबदारी बांगलादेशला दिली होती. मात्र राजकीय संकटामुळे ही स्पर्धा यूएईला हलवण्यात आली आहे. अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे.






हे ही वाचा -


Rohit Sharma Ind vs Ban : "विचार करण्याची गरज नाही...", कर्णधार रोहितने बांगलादेशविरुद्ध सामन्यापूर्वी भारतीय Playing 11बद्दल केलं मोठं वक्तव्य 


IPL 2025 Rohit Sharma : मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात मोठी घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा होणार कर्णधार?


युरोपीयन तरुणींची नीरज चोप्रासोबत फोटो काढण्यासाठी धडपड; सेल्फीनंतर नंबरही मागितला, Video