Rohit Sharma Retirement : रोहित शर्माची उचलबांगडी की निवृत्ती घेणार? BCCIने दिली मोठी अपडेट
भारतीय संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा सध्या त्याच्या कारकिर्दीतील वाईट टप्प्यातून जात आहे.
BCCI Official Statement on Rohit Sharma Retirement Rumors : भारतीय संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा सध्या त्याच्या कारकिर्दीतील वाईट टप्प्यातून जात आहे. एकीकडे त्याची बॅट शांत आहे. दुसरीकडे कर्णधारपद पूर्णपणे निष्प्रभ ठरले आहे. मेलबर्न कसोटीतही तेच पाहायला मिळाले. प्रथम क्षेत्ररक्षण करताना त्याने कर्णधारपदाच्या अनेक चुका केल्या. त्यानंतर तो फलंदाजी करताना तो सलामीला आला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि तो 3 धावा करून स्वस्तात बाद झाला. दरम्यान, एक मीडिया रिपोर्ट देखील समोर आला आहे की, जर टीम इंडिया WTC च्या फायनलमध्ये पोहोचू शकली नाही तर रोहित टेस्ट फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. मात्र, बीसीसीआयने अशा बातम्यांना बेताल ठरवले आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, रोहितसोबत निवृत्तीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. या सर्व अफवा आहेत आणि आम्ही अफवांवर भाष्य करत नाही. अशा अफवा ऐकण्याची ही पहिलीच वेळ नाही. तो कठीण काळातून जात आहे, पण त्याने निवृत्ती घ्यायची की नाही हे त्याच्यावर अवलंबून आहे. आम्ही रोहितकडून याबद्दल काहीही ऐकले नाही.
Indian skipper Rohit Sharma is gone for just three runs! #AUSvIND pic.twitter.com/m1fLiqKLO7
— cricket.com.au (@cricketcomau) December 27, 2024
खरंतर, रोहित बऱ्याच दिवसांपासून आपली लय परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण नशीब त्यांच्या बाजूने नाही. 2024 मध्ये खेळल्या गेलेल्या 25 कसोटी डावांमध्ये रोहितच्या बॅटमधून फक्त 625 धावा झाल्या आहेत. रोहितचे कर्णधारपदही पूर्वीसारखे दिसत नाही. एकेकाळी भारतीय संघ डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत सहज पोहोचेल असे वाटत होते, आता हे समीकरण पण अवघड झाले आहे.
बीसीसीआयचा अधिकारी पुढे म्हणाला, 'पहा, सर्व संघांमध्ये बदल करण्याचे नियोजन आहे. ही काही नवीन गोष्ट नाही. पण रोहितला निवृत्तीसाठी कोणीही जबरदस्ती करू शकत नाही. हे मूर्खपणाचे असेल. त्याने नुकताच आम्हाला टी-20 वर्ल्ड कप जिंकून दिला आहे आणि आमच्याकडे चॅम्पियन्स ट्रॉफी येत आहे. निवृत्तीचा निर्णय सर्वस्वी खेळाडूंवर अवलंबून आहे. त्याची सक्ती कधीच केली जात नाही.
रोहितची खराब कामगिरी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत त्याने 4 डावात 5.5 च्या सरासरीने केवळ 22 धावा केल्या आहेत. यादरम्यान भारतीय कर्णधाराने 3,6,10 आणि 3 धावांची खेळी खेळली. तर कसोटीच्या शेवटच्या 14 डावांमध्ये तो 11.07 च्या सरासरीने केवळ 155 धावा करू शकला आहे. या काळात त्याच्या बॅटमधून फक्त 1 अर्धशतक झळकले. रोहितने या 14 डावांमध्ये 5 वेळा दुहेरी आकड्यांचा स्पर्श केला, तर 9 वेळा तो 10 धावांच्या आत बाद झाला. त्याचबरोबर नुकतीच न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 0-3 अशी गमावली.
हे ही वाचा -