Ind vs Aus : पर्थ कसोटीत खेळणार कर्णधार रोहित... 'ही' असणार टीम इंडियाची प्लेइंग-11, 'या' खेळाडूचा पत्ता कट?
भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात असून दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
India vs Australia 1st Test Plying XI : भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात असून दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. ही मालिका भारतीय संघासाठी लिटमस टेस्टपेक्षा कमी असणार नाही. मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध सलग तीन कसोटी सामने गमावल्यानंतर टीम इंडिया प्रचंड दडपणाखाली आहे. टीम इंडियाने 2018-19 आणि 2020-21 च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला होता. दोन्ही वेळी भारताने कांगारू संघाचा 2-1 असा पराभव केला होता. आता ऑस्ट्रेलियात मालिका विजयाची हॅट्ट्रिक साधण्याकडे संघाचे लक्ष लागले आहे.
रोहित शर्मा झाला बाबा
यावेळी भारतात मालिका जिंकणे सोपे नसेल. रोहित शर्माची अनुपस्थितीमुळे संघ संकटात सापडला आहे. रोहित दुसऱ्यांदा वडील झाला आहे. त्यांची पत्नी रितिका हिने एका मुलाला जन्म दिला आहे. याच कारणामुळे रोहित अद्याप संघात सहभागी होऊ शकलेला नाही. आता तो संघात सामील होऊन दोन-तीन दिवसांत सरावाला सुरुवात करेल, अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास तो पर्थ कसोटीत खेळताना दिसू शकतो. आता पहिली टेस्ट सुरू होण्यासाठी एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. आणि अशी एक बातमी येत आहे की, रोहित 18 तारखीला जाऊ शकतो. पण यावर काही अधिकृत माहिती समोर आली नाही.
भारतीय टॉप ऑर्डर सध्या चांगली कामगिरी करत नाहीये. अशा परिस्थितीत संघाला कर्णधार आणि सलामीवीर म्हणून त्याची नितांत गरज आहे. त्याचा पर्याय म्हणून अभिमन्यू ईश्वरन आणि केएल राहुल यांचा संघात समावेश आहे, पण ते दोघेही धावा काढण्यासाठी धडपडत आहेत. राहुलच्या कोपरालाही दुखापत झाली आहे. मात्र, ते गंभीर नसल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही खेळाडूंनी यशस्वी जैस्वालसह डावाची सलामी देण्याचा जोरदार दावा मांडला नाही.
रोहित आला तर राहुलला संघाबाहेर बसावे लागू शकते. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यांतही त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपताच राहुलला ध्रुव जुरेलसह ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आले. ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ संघाच्या अनधिकृत कसोटी सामन्यात राहुल अपयशी ठरला होता. त्याला 4 आणि 10 धावा करता आल्या. दुसरीकडे, जुरेलने दोन्ही डावांत अर्धशतके झळकावून स्वत:ला सिद्ध केले. अशा स्थितीत राहुलपेक्षा जुरेलला प्राधान्य दिले जाऊ शकते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची संभाव्य प्लेइंग-11 : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, आकाश दीप, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जैसवाल मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.