IND vs AUS Champions Trophy 2025 Semi-Final : घाबरु नका...भारतासाठी डोकेदुखी ठरणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला रोखण्याचा प्लॅन तयार; पहिल्या 5 षटकांतच काम होईल फत्ते!
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला उपांत्य फेरीचा सामना आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात यांच्यात खेळवला जाणार आहे.
India vs Australia Semifinal Match : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) पहिला उपांत्य फेरीचा सामना आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात (India vs Australia Semifinal Match) यांच्यात खेळवला जाणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होईल.
भारतीय संघ दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा सामना करेल तेव्हा सर्वांच्या नजरा एकाच खेळाडूवर खिळलेल्या असतील तो म्हणजे ट्रॅव्हिस हेड. हेडने नेहमीच मोठ्या सामन्यांमध्ये टीम इंडियाला अडचणी दिल्या आहेत. अशा परिस्थितीत, जर भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळायचा असेल, तर हेडला कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर बाद करावा लागेल. अलिकडच्या अनेक मोठ्या सामन्यांमध्ये ट्रॅव्हिस हेड टीम इंडियासाठी समस्या ठरला आहे. मग तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल असो किंवा 2023 च्या वर्ल्ड कपचा फायनल असो. टीम इंडियाविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये हेडने शतके झळकावली. नुकत्याच संपलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्येही हेड टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरला.
ट्रेंडिंग
ट्रॅव्हिस हेडला रोखण्याचा प्लॅन तयार...
आता मोठा प्रश्न हा आहे की, हेडला कसे रोखायचे, कारण आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सर्व मोठ्या सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाज त्याच्याविरुद्ध अपयशी ठरले आहेत. हेडची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे आता येणार चेंडू. म्हणजे जर टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज सामना सुरू झाल्यानंतर काही षटके चेंडू आत स्विंग करू शकले तर हेडची विकेट मिळण्याची शक्यता जास्त आहे. याआधीही असे दिसून आले आहे की हेडने आता येणाऱ्या चेंडूवर अनेकदा त्याची विकेट गमावतो. अशा परिस्थितीत आजच्या सामन्यात मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्या यांना ही जबाबदारी घ्यावी लागेल.
खरंतर, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना दुबईमध्ये खेळवला जाणार आहे. जिथे या स्पर्धेत भारताने त्यांचे सर्व सामने खेळले आहेत आणि जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने त्यांचे सर्व सामने पाकिस्तानमध्ये खेळले आहेत. पण, त्यापैकी फक्त ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला होता. तर अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. अशा परिस्थितीत भारताला याचा फायदा होऊ शकतो, कारण या स्पर्धेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त सामने खेळले आहेत.
भारताची संभाव्य Playing X I:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलियाची संभाव्य Playing XI :
जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस (यष्टीरक्षक), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अॅडम झांपा, स्पेन्सर जॉन्सन.
हे ही वाचा -
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...