India vs Australia 1st Semi-Final : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. या दोन्ही संघांमधील सामने नेहमीच हाय व्होल्टेज ड्रामाने भरलेले असतात. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. ऑस्ट्रेलियन संघात दोन बदल झाले आहेत.






भारतीय कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात सलग 14 व्यांदा नाणेफेक गमावली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने प्लेइंग-11मध्ये दोन बदल केले आहेत. मॅथ्यू शॉर्टची जागा कूपर कॉनोलीने घेतली आहे, तर स्पेन्सर जॉन्सनच्या जागी तनवीर संघा आला आहे. भारतीय संघाने प्लेइंग-11 मध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. याचा अर्थ असा की या सामन्यातही संघ चार फिरकीपटूंसह खेळेल.


दोन्ही संघांची प्लेइंग-11


ऑस्ट्रेलिया : कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिश (यष्टीरक्षक), अ‍ॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अ‍ॅडम झाम्पा, तनवीर संघा.


भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.






वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा  


तर एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 151 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. जिथे भारताने 57 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 84 सामने जिंकले आहेत. तर 10 सामने अनिर्णीत राहिले आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया भारतासाठी निश्चितच समस्या निर्माण करेल.


आयसीसी स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आघाडीवर  


आयसीसीकडे 2 एकदिवसीय स्पर्धा, वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी आहेत. या स्पर्धांमध्ये दोन्ही संघ 18 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये भारताने 7 आणि ऑस्ट्रेलियाने 10 वेळा विजय मिळवला आहे. या काळात, एक सामना अनिर्णीत राहिला. पण, दोन्ही संघ आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत नवव्यांदा आमनेसामने येतील.


हे ही वाचा -


IND vs AUS Champions Trophy 2025 Semi-Final : घाबरु नका...भारतासाठी डोकेदुखी ठरणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला रोखण्याचा प्लॅन तयार; पहिल्या 5 षटकांतच काम होईल फत्ते!