दहा वर्षापूर्वी आजच्याच दिवशी द्विशतक, मात्र आज रोहित शर्मा घरच्या मैदानात दुसऱ्याच चेंडूवर क्लीन बोल्ड
Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्मा वानखेडे मैदानावर पहिल्यांदाच वनडे सामना खेळत होता.
Rohit Sharma : वानखेडेच्या मैदानावर श्रीलंकेच्या कर्णधाराने (ICC Cricket World Cup 2023) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भन्नाट फॉर्मात असलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल मैदानात उतरले. यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्माने धावांचा पाऊस पाडला. पण घरच्या मैदानावर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर तंबूत परतला. रोहित शर्माने पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर आज तो मोठी धावंसख्या उभारणार, असेच सर्वांना वाटले. पण दुसऱ्याच चेंडूवर मधुशंकाने त्रिफाळा उडवला. आजच्याच दिवशी 2013 मध्ये रोहित शर्माने द्विशतक ठोकले होते. आजही रोहित शर्मा द्विशतक ठोकेल, असेच सर्वांना वाटले होते. पण चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. रोहित शर्मा फक्त चार धावा काढून तंबूत परतला.
टीम इंडियाचा कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्मा वानखेडे मैदानावर पहिल्यांदाच वनडे सामना खेळत होता. त्यामुळे त्याच्याकडून चाहत्यांना मोठी खेळीची अपेक्षा होती. पण चाहत्यांची साफ निराशा झाली. वानखेडे मैदानावर रोहित शर्मा दुसऱ्या चेंडूवर माघारी परतला. त्याला मधुशंकाने त्रिफाळाचीत बाद केले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर शांतता पसरली होती.
Rohit Sharma becomes the first Indian to complete 400 runs in World Cup 2023.
— Johns. (@CricCrazyJohns) November 2, 2023
- Captain, Leader, Legend, Hitman. pic.twitter.com/yK8QakMV1g
रोहित शर्मासाठी आजचा दिवस खास आहे. कारण, 2 नोव्हेंबर 2013 रोजी त्याने द्विशतक ठोकले होते. रोहित शर्माने करिअरमधील पहिले द्विशतक आजच्याच दिवशी ठोकले होते. त्यामुळे रोहितच्या चाहत्यांना त्याच्याकडून पुन्हा एकदा द्विशतकाची अपेक्षा होती.
IND vs SL: Watch - Dilshan Madushanka Bamboozles Rohit Sharma; Ritika Sajdeh Left Shockedhttps://t.co/eP2pdq1iEK
— News Funda (@Bballshoeguide) November 2, 2023
रोहित शर्माचे पहिले द्विशतक -
रोहित शर्माने वनडे करिअरमध्ये आतापर्यंत तीन द्विशतके ठोकली आहेत. यामधील पहिले द्विशतक ऑस्ट्रेलियाविरोधात बेंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आले होते. रोहित शर्माने 158 चेंडूत 16 षटकारांच्या मदतीने 209 धावांचा पाऊस पाडला होता. त्यावेळी सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यानंतर द्विशतक ठोकणारा रोहित शर्मा तिसरा फलंदाज ठरला होता. रोहित शर्मा दहा वर्षांनंतर पुन्हा द्विशतक ठोकेल अशी अपेक्षा चाहत्यांची होती, पण दुसऱ्याच चेंडूवर निराशा पदरी पडली.
On this day in 2013, Rohit Sharma redefined cricket history with his first ODI double-century. 🏏#RohitSharma #OnThisDay pic.twitter.com/wfHCF2fFRN
— CricClubs (@cricclubs) November 2, 2023