Rohit Sharma Century Ind vs Eng 2nd ODI : सततचे अपयश एखाद्याच्या संयमाची परीक्षा घेते. पण जेव्हा ही वाट संपते आणि चांगला निकाल मिळतो, तेव्हा आनंदही तितकाच मोठा असतो. आज भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडियाच्या चाहत्यांचीही हीच अवस्था आहे. गेल्या काही महिन्यांपासून सतत अपयशाला तोंड देत असलेल्या भारतीय कर्णधाराने अखेर आपला जुना फॉर्म दाखवला. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने स्फोटक फलंदाजी केली आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर शानदार शतक झळकावले.
गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय कर्णधार रोहित शर्मा त्याच्या फलंदाजीच्या फॉर्मशी झुंजत होता. त्याच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या. गेल्या वर्षी भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणार रोहित सतत संघर्ष करताना दिसला. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झालेल्या कसोटी मालिकेत अपयशी ठरलेल्या रोहितने रणजी ट्रॉफी सामन्यातही चांगली कामगिरी केली नाही. त्यानंतर नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो फक्त 2 धावा करून बाद झाला.
रोहित शर्माने ठोकले धमाकेदार शतक!
कटकमध्ये इंग्लंडविरुद्ध रोहित शर्माने धमाकेदार शतक झळकावले. रोहितने टीम इंडियासाठी शानदार फलंदाजी केली आणि त्याच्या कारकिर्दीतील 32वे शतक ठोकले. रोहितच्या या खेळीत 10 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने अनेक विक्रम मोडले.
रोहितने एकदिवसीय सामन्यात शेवटचे शतक कधी ठोकले होते?
रोहितने दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्ध त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील शेवटचे शतक ठोकले होते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना ऑक्टोबर 2023 मध्ये खेळला गेला होता. रोहितने स्फोटक फलंदाजी केली आणि 84 चेंडूत 131 धावा केल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 49 वे शतक
रोहित शर्माचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे एकूण 49वे शतक आहे. कटकमध्ये शतक ठोकून त्याने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीत राहुल द्रविडला मागे टाकले आहे. सचिन तेंडुलकरकडे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके (100) आहेत. सचिननंतर विराट कोहली (81) हा दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज आहे. त्याच्यानंतर रोहित शर्मा (49), राहुल द्रविड (48), सौरव गांगुली (38) आणि वीरेंद्र सेहवाग (38) यांचा क्रमांक लागतो.
हे ही वाचा -