Ind vs Eng 2nd ODI : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा बऱ्याच काळानंतर फॉर्ममध्ये दिसला. त्याने पॉवरप्लेमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार मारला. त्याने 18 चेंडूत 29 धावा केल्या आहेत. त्याने शुभमन गिलसोबत भारताला चांगली सुरुवात करून दिली. दरम्यान, भारताच्या डावात सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूनंतर सामना थांबवावा लागला. कटकमधील फ्लडलाइट्समध्ये बिघाड झाल्यामुळे सामना थांबवण्यात आला. दोन्ही संघांचे खेळाडू बराच वेळ मैदानावर वाट पाहत होते. पण त्यांना नंतर मैदान सोडावे लागले.




कटक स्टेडियममध्ये अचानक बिघडली फ्लडलाइट 


भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना कटकमध्ये खेळला जात आहे. पण टीम इंडियाच्या डावादरम्यान कटकमधील बाराबाटी स्टेडियममध्ये अचानक फ्लडलाइट बिघडली आहे. त्यामुळे मैदानावरील प्रकाश कमी झाला. लाईट गेल्यानंतर सामना बराच वेळ थांबला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 305 धावांचे लक्ष्य ठेवले होते. याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाची सुरुवात धमाकेदार झाली.




इंग्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 6.1 षटकांत कोणताही विकेट न गमवता 48 धावा केल्या आहे. या काळात, बातमी लिहिण्यापर्यंत, रोहित शर्माने 18 चेंडूत 29 धावा केल्या होत्या. तर शुभमन गिलने 19 चेंडूत 17 धावा केल्या. गिलने 3 चौकार मारले. पण यानंतर प्रकाशाची समस्या निर्माण झाली.




चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला राग


खरंतर, भारतीय डावाच्या सहाव्या षटकात फ्लडलाइटमध्ये समस्या आली. यामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला. पण यानंतर फक्त एकच चेंडू टाकण्यात आला आणि नंतर परत लाईट गेली. यामुळे सामना मध्यंतरी थांबवावा लागला. हे पाहून टीम इंडियाचे खेळाडू मैदानाबाहेर पडले. इंग्लंडचे खेळाडूही मैदानाबाहेर गेले. प्रकाशाच्या समस्येमुळे सामना थांबवण्यात आला. संतप्त चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला. टीम इंडियाच्या चाहत्यांनी इंस्टाग्रामवर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत.


हे ही वाचा -


Ind vs Eng सामन्यादरम्यान संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला झाली गंभीर दुखापत, चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर?


Rohit Sharma on Harshit Rana : '....तुला डोकं आहे का?' बॉलिंग करताना हर्षित राणाकडून मोठी चूक, कॅप्टन रोहित रागाने लाल, थेट मैदानावरच काढली अक्कल!