Rohit Sharma on Harshit Rana : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने आतापर्यंत तीन विकेट गमावल्या आहेत. हे वृत्त लिहिताना, इंग्लंड संघाने 4 विकेट्स गमावून 220 धावा ओलांडल्या आहेत. पहिल्या एकदिवसीय सामन्यात जिथे भारतीय संघाने संपूर्ण इंग्लंड संघाला फक्त 248 धावांत गुंडाळले होते, दुसरीकडे, या सामन्यात भारतीय संघाची ती पकड दिसत नाही. यावेळी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मैदानावर खेळाडूंवर रागावताना दिसला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.






कर्णधार रोहित शर्मा हर्षित राणावर संतापला....


सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा वेगवान गोलंदाज हर्षित राणावर संतापला होता. खरंतर असं झालं की, जेव्हा हर्षित राणा 32 व्या षटकात गोलंदाजी करायला आला, तेव्हा त्याने पहिल्या चार चेंडूत एकही धाव दिली नाही. पण यानंतर पाचव्या चेंडूवर जोस बटलर स्ट्राईकवर होता. जेव्हा बटलरने चेंडू मारला, तेव्हा तो हर्षित राणाच्या हातात गेला. त्याने कोणता विचार न करता चेंडू थेट स्टंपकडे मारला. पण, बटलर जागेवर उभा होता. मागे चेंडू रोखण्यासाठी कोणीही क्षेत्ररक्षक नव्हता आणि चेंडू थेट दिशेने सीमारेषेवर गेला. अशाप्रकारे इंग्लंडला फुकटात 4 धावा मिळाल्या.






रोहितचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल


हे पाहून कर्णधार रोहित शर्मा रागाने लाल झाला आणि त्याने मैदानाच्या मध्यभागी हर्षित राणाला फटकारले. रोहित शर्मा त्याला म्हणत होता की तुझे डोके कुठे आहे? या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही वेगाने व्हायरल होत आहे. पण, हर्षित राणाने कर्णधार रोहित शर्माच्या विधानाला प्रतिसाद दिला नाही आणि तो मान खाली घालून गोलंदाजी करायला गेला.






हे ही वाचा -


Australia ODI squad For Sri Lanka : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी ऑस्ट्रेलियाची नवी खेळी; श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी धक्कादायक निर्णय, पहिल्यांदाच असं घडलं!