Rohit Sharma Half Century IND vs ENG  2nd ODI : कटकमधील बाराबती स्टेडियमवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने 10 डावांचा दुष्काळ संपवला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने फक्त 30 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे चौथे सर्वात जलद अर्धशतक आहे. रोहित शर्माचे हे अर्धशतक 10 आंतरराष्ट्रीय डावांनंतर आले आहे. आता हिटमॅनने टीकाकारांची बोलती बंद केली आहे.




खरंतर, रोहित शर्माने यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्ये बंगळुरू येथे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात शेवटचे अर्धशतक केले होते. त्या सामन्यात रोहित शर्माने दुसऱ्या डावात 52 धावा केल्या. त्यानंतर, त्याने पुढील 10 डावांमध्ये अनुक्रमे 0, 8, 18, 11, 3, 6, 10, 3, 9 आणि 2 धावा केल्या. त्यामुळे रोहितवर खुप टीका झाल्या, पण खणखणीत अर्धशकत ठोकूण त्याने टीकाकारांना सणसणीत उत्तर दिली आहे.


हिटमॅनने थेट ख्रिस गेललाही टाकलं मागे!


यासह, रोहित शर्मा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. त्याने ख्रिस गेलला मागे टाकले. रोहित शर्माने आता एकदिवसीय सामन्यांमध्ये 335 षटकार मारले आहेत. रोहित शर्माने 267 एकदिवसीय सामन्यांमधील 259 व्या डावात ही कामगिरी केली. ख्रिस गेलने त्याच्या कारकिर्दीत 301 एकदिवसीय सामन्यांच्या 294 डावांमध्ये 331 षटकार मारले होते. 


आता एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित शर्मा आता फक्त पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या मागे आहे. शाहिद आफ्रिदीने त्याच्या कारकिर्दीत 398 एकदिवसीय सामन्यांच्या 369 डावांमध्ये 351 षटकार मारले आहे.




50 ODI सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणारा आठवा भारतीय! 


इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकताच रोहित शर्माने सचिन तेंडुलकर, कपिल देव, एमएस धोनी, सौरव गांगुली आणि विराट कोहली सारख्या दिग्गजांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 50 किंवा त्याहून अधिक एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणारा तो आठवा भारतीय आहे.




हे ही वाचा - 


Ind vs Eng 2nd ODI : हिटमॅनची वादळी बॅटिंग, पण मध्येच अघटीत घडलं; चक्क सामना थांबवण्याची वेळ; नेमकं कारण काय?


Rohit Sharma on Harshit Rana : '....तुला डोकं आहे का?' बॉलिंग करताना हर्षित राणाकडून मोठी चूक, कॅप्टन रोहित रागाने लाल, थेट मैदानावरच काढली अक्कल!