Rohit Sharma Corona Positive : भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला आणि एकमेव कसोटी सामना 1 जुलैला होणार असून याआधी टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला कोरोनाची (Corona Positive) लागण झाली आहे. शनिवारी त्यांच्या रॅपिड अँटीजेन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रोहित शर्मा सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. बीबीसीसीआयने (BCCI) ट्विट करत याची माहिती दिली आहे. रोहित शर्मा सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.
बीबीसीसीआयने (BCCI) ट्विट करत म्हटलं आहे की, 'भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या रोहित टीम इंडियाच्या हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये आहे. रविवारी रोहितची आरटी-पीसीआर टेस्ट केली जाईल.'
रोहित शर्मा सराव सामन्याबाहेर
लीसेस्टरशायर विरुद्ध खेळल्या जात असलेल्या चार दिवसीय सराव सामन्यात रोहित शर्मा संघाचा भाग होता. पहिल्या डावातही त्यानं फलंदाजी केली, मात्र दुसऱ्या डावात त्याला फलंदाजी करता आला नाही. दुसऱ्या डावात रोहितने युवा फलंदाज केएस भरतला संघासाठी सलामी दिली. बीसीसीआयने सांगितले की रोहित शर्मा सध्या हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये असून तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.
रोहित शर्माचा आरटी-पीसीआर चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला तर हा भारतीय संघासाठी मोठा झटका ठरू शकतो, कारण रोहित 1 जुलैपासून होणाऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर जाऊ शकतो. त्याला कोरोनातून बरं होण्यासाठी किमान एक आठवडा लागेल. असे झाल्यास रोहित पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.
अश्विन आणि विराटलाही झाली होती कोरोनाची लागण
भारतीय संघ 16 जूनला इंग्लंडला रवाना झाला. टीम इंडियाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे टीमसोबत इंग्लंडला गेला नाही. गेल्या आठवड्यात लंडनला पोहोचलेल्या विराट कोहलीलाही कोरोनाची लागण झाली होती. हे दोन्ही खेळाडू आता बरे झाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- BCCI On Virat Kohli: विराट कोहलीच्या कोरोना पॉझिटिव्हच्या वृत्तावर बीसीसीआयची मोठी अपडेट
- Video : राहुल द्रविडच्या उपस्थितीत कोहली पुन्हा 'लिडर', इंग्लंडमध्ये खेळाडूंना प्रेरणा देतानाचा व्हिडीओ व्हायरल
- ICC Test All Rounder Ranking : अश्विन-होल्डरला मागे टाकत शाकिबची दुसऱ्यास्थानी झेप; जाडेजा अव्वलस्थानी कायम