BCCI On Virat Kohli: इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (BCCI) कोरोना झाल्याचं वृत प्रसारमाध्यमांत झळकत आहे. यावर भारतीय नियामक मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं मोठी अपडेट्स दिली आहे. विराट कोहलीला कोरोनाची लागण झाली होती, ही माहिती खरी आहे. परंतु, तो आता बरा झालाचं बीसीसीआयनं म्हटलंय.
भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनलाही कोरोनाची लागण झालीय. यामुळं तो बाकीच्या खेळाडूंसोबत लंडनला गेला नाही. मात्र, तो आता बरा असून सराव सामन्यापूर्वी तो लीसेस्टरला पोहोचेल अशी अपेक्षा आहे. यानंतर विराट कोहलीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. ज्यामुळं विराट बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात खेळणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यावर बीसीसीआयनं मोठी अपडेट्स दिली आहे. विराटला कोरोनाची लागण झाल्याची माहिती खरी आहे. परंतु, आता तो कोरोनातून बरा झाला आहे, असं बीसीसीआयनं स्पष्ट सांगितलं आहे.
बर्मिंगहॅम कसोटी सामना भारतासाठी किती महत्वाचा आहे? हे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. "बर्मिंगहॅम कसोटी सामना जिंकण्या व्यतिरिक्त वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशी गुणतालिका भारतीय संघासाठी महत्वाची असणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ जोर लावेल", राहुल द्रविडनं म्हटलं होतं. यातच विराटची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येताच क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला. भारतीय संघ 24 जूनपासून लीसेस्टर काउंटी संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. या सामन्यात विराट कोहली खेळण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा-