ICC Test All Rounder Ranking : बांग्लादेशचा स्टार अष्टपैलू शाकिब अल् हसन (Shakib Al Hasan) आयसीसी टेस्ट प्लेअर रँकिंगमध्ये (ICC Test All Rounder Ranking) थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये मागील काही सामन्यांत त्याने केलेल्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर त्याने हा नंबर मिळवला आहे. दरम्यान या यादीत अव्वलस्थानी भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) अजूनही अव्वल स्थानी कायम आहे.

शाकिबने वेस्टइंडीजविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात बांग्लादेशकडून शानदार प्रदर्शन केलं आहे. बांग्लादेशचा कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्त्व करताना त्याने पहिल्या डावात 51 धावांची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने 63 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत दोन्ही डावात अर्धशतकं झळकावली. ज्यानंतर त्याच्या रँकिंगमध्ये ही सुधारणा झाली आहे. मागील अनेक वर्षे विविध दुखापतीनंतरही शाकिब अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिगमध्ये अव्वल स्थानांच्या जवळपास असतो. त्यामुळे आता तो अव्वलस्थानी पोहोचल्यास ही त्याच्यासाठी अत्यंत मोठी गोष्ट असेल. सध्या तो 346 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

आश्विन-होल्डरला टाकलं मागे

दोन क्रमांकाच्या फायद्याने शाकिब दुसऱ्या स्थानी पोहोचला असून त्याने भारताच्या रवींचंद्रन आश्विन आणि वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकलं आहे. आश्विनच्या खात्यावर 341 तर होल्डरच्या नावावर 329 गुण आहेत. तर अव्वलस्थानी असलेल्या रवींद्र जाडेजाच्या नावावर तब्बल 385 गुण असल्याने त्याच्या आसपासही कोणता खेळाडू नसल्याचं दिसून येत आहे. 

पाहा TOP 10 अष्टपैलू कसोटी खेळाडू  -

क्रमांक खेळाडूचे नाव देश रेटिंग
1 रवींद्र जाडेजा भारत 385
2 शाकिब अल हसन बांग्लादेश 346
2 आर. अश्विन भारत  341
4 जेसन होल्डर वेस्ट विंडिज 329
5 बेन स्टोक्स इंग्लंड 307
6 मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलिया 291
7 पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया 263
8 कॉलिन डी ग्रॅंडहोम न्यूझीलंड 243
9 ख्रिस वोक्स इंग्लंड 230
10  कायल जेमिसन न्यूझीलंड 226

हे देखील वाचा-