IND vs ENG : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 1 जुलैपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. सर्वात आधी एकमेव कसोटी सामना खेळल्यानंतर टी20 आणि अखेर एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान या महत्त्वाच्या सामन्यांसाठी भारतीय संघ (Team India) इंग्लंडमध्ये पोहोचला असून प्रशिक्षक राहुल द्रविड खेळाडूंचा कसून सराव घेत आहे. यावेळी द्रविडच्या उपस्थितीत माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) संघाला Motivation अर्थात प्रेरणा देत असल्याचं दिसून आलं. असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहिला आणि एकमेव कसोटी सामना 1 जुलैला होणार असून त्याआधी वॉर्मअप मॅचेस खेळवल्या जातील. या सामन्यांपूर्वी आता माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीला हेड कोच राहुल द्रविडने खास जबाबदारी दिली आहे. वॉर्मअप सामन्यांपूर्वी विराट खेळाडूंना सरावादरम्यान मोटीवेट करताना दिसत आहे. लीसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबने देखील त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

कसा आहे भारतीय संघ: 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंड आणि भारत यांच्यात 1 ते 5 जुलै रोजी एकमेव कसोटी होणार असून त्यानंतर खालीलप्रमाणे सामने पार पडणार आहेत. त्यानंतरचे सामने खालीलप्रमाणे खेळवले जातील.

इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक-

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना 7 जुलै एजेस बाउल
दुसरा टी-20 सामना 9 जुलै एजबॅस्टन
तिसरा टी-20 सामना 10 जुलै ट्रेंट ब्रिज

इंग्लंड- भारत एकदिवसीय मालिका वेळापत्रक- 

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 12 जुलै ओव्हल 
दुसरा एकदिवसीय सामना 14 जुलै लॉर्ड्स
तिसरा एकदिवसीय सामना 17 जुलै मँचेस्टर 

हे देखील वाचा-