India vs New Zealand 3rd Mumbai Test : मुंबईत खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत भारतीय क्रिकेट संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाने याआधी बंगळुरू आणि पुणे येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या 2 कसोटीत पराभव पत्करून मालिका गमावली होती. मुंबई कसोटीत भारताला विजयासाठी फक्त 147 धावांची गरज होती, परंतु संघ 121 धावांवर ऑलआऊट झाला आणि सामना 25 धावांनी गमावला. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर टीकेला सामोरे जावे लागत आहेत. टीम इंडियाच्या माजी कर्णधारानेही या पराभवासाठी रोहित आणि गंभीरला जबाबदार धरले आहे.


कोच गौतम गंभीरवर भडकला माजी कर्णधार


भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने मुंबई कसोटीतील भारताच्या पराभवासाठी रोहित शर्मा आणि गौतम गंभीरला जबाबदार धरले आहे. कुंबळे म्हणाले की, पराभवासाठी फलंदाजांना दोष देणे काही चांगले नाही. तुम्ही टर्निंग ट्रॅक द्या आणि त्यांच्याकडून चौथ्या डावात 150 धावांचा पाठलाग करण्याची अपेक्षा करा, कर्णधार आणि प्रशिक्षक यांना विचारले पाहिजे की, जेव्हा त्यांना माहित होते की त्यांचे फलंदाज फिरकीविरुद्ध खराब फॉर्ममध्ये आहेत, तेव्हा त्यांनी फिरकी खेळपट्टीची मागणी का केली?




न्यूझीलंडने रचला इतिहास 


भारतात कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करणारा न्यूझीलंड 2000 नंतरचा पहिला संघ ठरला आहे. न्यूझीलंडने ही मालिका 3-0 ने जिंकली. न्यूझीलंडने भारतात पहिल्यांदाच कसोटी मालिकेत भारताचा पराभव केला आहे. त्याचबरोबर भारताने 2012 नंतर प्रथमच घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली आहे.


कोच गौतम गंभीरच्या काळात टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. जुलैमध्ये ते भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक झाले. त्यानंतर श्रीलंकेतील वनडे मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. आता न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत लाजिरवाणा पराभव झाला. गंभीरने मेंटॉर असताना आयपीएलमध्ये अनेक यश मिळवले होते. त्याने लखनऊ सुपर जायंट्सला दोनदा प्लेऑफमध्ये नेले. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्यात आले. तो पहिल्यांदाच एखाद्या संघाला कोचिंग देत आहे आणि त्याच्या कोचिंगच्या 4 महिन्यांतच अनेक लाजिरवाणे रेकॉर्ड्स बनले.


हे ही वाचा -


Rohit Sharma : लाजिरवाण्या कामगिरीनंतर रोहित शर्माने घेतली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार, 'हा' खेळाडू असणार कर्णधार?


WTC Final Scenarios : WTC फायनलचा रस्ता रोहित सेनेसाठी झाला माउंट एव्हरेस्टसारखा! ऑस्ट्रेलियात करावे लागणार 'हे' काम