Rohit Sharma Ind vs Aus Test Series : टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला. तीन किंवा त्याहून अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला घरच्या मैदानावर अशा पराभवाचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईत झालेल्या या कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यात टीम इंडियाला चौथ्या डावात 147 धावांचे लक्ष्य होते, मात्र संपूर्ण संघ 121 धावांवरच मर्यादित राहिला. या मालिकेतील पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. दरम्यान या सामन्यानंतर रोहित शर्माबाबत एक मोठी अपडेट मिळाली आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये होणार आहे. पण भारतीय कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. रोहित म्हणाला की तो त्या सामन्यात खेळेल की नाही याची खात्री नाही.
खरंतर, काही काळापासून अशा बातम्या येत आहेत की, रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. या कारणामुळे तो कसोटी सामन्याला मुकावू शकतो. जर रोहित पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर गेला तर त्याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार जसप्रीत बुमराह भारतीय संघाची धुरा सांभाळू शकतो.
न्यूझीलंडविरुद्ध रोहितची खराब कामगिरी
मुंबई कसोटीत न्यूझीलंडने भारताचा 25 धावांनी पराभव केला. या सामन्याच्या पहिल्या डावात रोहित शर्माने 18 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात तो केवळ 11 धावा करून बाद झाला. संपूर्ण मालिकेत रोहितची खराब कामगिरी पाहायला मिळाली. त्याला 3 सामन्यात केवळ 91 धावा करता आल्या. विराट कोहलीचीही तीच अवस्था होती. कोहलीने 3 सामन्यात केवळ 93 धावा केल्या.
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये दुसरी कसोटी खेळणार आहे. यानंतर तिसरी कसोटी 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये तर चौथी कसोटी मेलबर्नमध्ये 26 डिसेंबरपासून खेळवली जाईल. या मालिकेतील शेवटचा सामना 3 जानेवारीपासून सिडनी येथे होणार आहे.
हे ही वाचा -