WTC Final Scenarios : WTC फायनलचा रस्ता रोहित सेनेसाठी झाला माउंट एव्हरेस्टसारखा! ऑस्ट्रेलियात करावे लागणार 'हे' काम
न्यूझीलंडने भारताचा 25 धावांनी पराभव करत मालिका 3-0 ने क्लीन स्वीप केली. भारतीय भूमीवर तीन सामन्यांची मालिका क्लीन स्वीप करणारा तो पहिला संघ ठरला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appन्यूझीलंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. आता टीम इंडिया 58.33 विजयी टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे.
आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे जिथे त्यांना 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग अधिक कठीण झाला आहे.
आता टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी उर्वरित 5 पैकी 4 सामने जिंकावे लागतील आणि एक सामना ड्रॉ करावा लागेल. अर्थात, इथून टीम इंडियाचा आणखी एक पराभव तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंग करू शकतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी जिंकूनही टीम इंडियाला उर्वरित संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाशिवाय दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकाही गुणतालिकेत पहिल्या चार स्थानांच्या शर्यतीत आहेत.