Road Safety World Series 2022: रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामातील पहिल्या सामन्यात इंडिया लीजेंड्सनं (India Legends) टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa Legends) संघाला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलंय. भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा इंडिया लीजेंड्सच्या संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. तर, माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्सवर (Jonty Rhodes) दक्षिण आफ्रिका लीजेंडच्या संघाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. दोन्ही संघात दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय. यामुळं आजचा सामना अधिक रोमांचक होण्याची शक्यता आहे. 


रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामात एकूण आठ संघ मैदानात उतरणात आहेत. इंडिया लिजेंड्स, दक्षिण आफ्रिका लीजेंड्स, श्रीलंका लीजेंड्स, न्यूझीलंड लीजेंड्स, इंग्लंड लीजेंड्स, बांगलादेश लीजेंड्स, ऑस्ट्रेलिया लीजेंड्स आणि वेस्ट इंडिज लीजेंड्स या आठ संघात सामने रंगणार आहेत. सचिन तेंडुलकर, शेन वॉटसन, ब्रायन लारा, इयान बेल, तिलकरत्ने दिलशान, जॉन्टी रोड्स, मखाया एनथिनी, सनथ जयसूर्या, ड्वेन स्मिथ, ब्रॅड हॅडिन आणि जेकब ओरम यांसारख्या दिग्गजांना पुन्हा मैदानात पाहण्यासाठी चाहत्यांची उस्तुकता शिगेला पोहचलीय. 


सचिन तेंडुलकरकडं इंडिया लीजेंड्सचं नेतृत्व
रस्ता सुरक्षिततेबद्दल जागरूकता पसरवण्याच्या उद्देशानं भारत सरकारच्या रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचे आयोजन केलं जातं. या स्पर्धेत जगभरातील माजी क्रिकेटपटू सहभाग घेतात. भारतीय खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाची धुरा पुन्हा एकदा दिग्गज सचिन तेंडुलकरकडं सोपवण्यात आली आहे. रैना व्यतिरिक्त, गतविजेत्या इंडिया लिजेंड्समध्ये युवराज सिंह, इरफान पठाण, हरभजन सिंह यांसारख्या अनेक भारतीय दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. 


इंडिया लीजेंड्स प्लेईंग इलेव्हन:
सचिन तेंडुलकर (कर्णधार), नमन ओझा (विकेट किपर), सुरेश रैना, युवराज सिंह, युसूफ पठाण, इरफान पठाण, स्टुअर्ट बिन्नी, मनप्रीत गोनी, मुनाफ पटेल, राहुल शर्मा, प्रज्ञान ओझा. 


दक्षिण आफ्रिका प्लेईंग इलेव्हन:
हेन्री डेव्हिड्स, मॉर्न व्हॅन विक (विकेटकिपर), अल्विरो पीटरसन, जॅक रुडॉल्फ, जॉन्टी रोड्स (कर्णधार), जोहान बोथा, एडी ली, जोहान व्हॅन डर वॅथ, गार्नेट क्रुगर, मखाया एनथिनी, अँड्र्यू पुटीक.


हे देखील वाचा-