Road Safety World Series, IND Legends vs SA Legends : भारतीय क्रिकेटमधील दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर, युवराज सिंह, सुरेश रैना पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या (Road Safety World Series) दुसऱ्या हंगामातील सामने खेळण्यासाठी या दिग्गजांसह जगभरातील दिग्गज सज्ज झाले आहेत. दरम्यान आज सिरीजचा पहिला सामना इंडिया लीजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्स (India Legends vs South Africa Legends) यांच्यात होणार असून नेमके कोणते दिग्गज मैदानात उतरु शकतात ते पाहूया... 

भारत लीजेंड्सची संभाव्य अंतिम  11 

सचिन तेंडुलकर (कर्णधार), एस. बद्रीनाथ, नमन ओझा, सुरेश रैना, युवराज सिंह, यूसुफ पठान, इरफान पठाण, प्रज्ञान ओझा, अभिमन्यु मिथुन, विनय कुमार आणि राहुल शर्मा

दक्षिण आफ्रिका लीजेंड्सची संभाव्य अंतिम  11 

एल्विरो पीटरसन, हेन्री डेविड्स, मोर्ने वॅन विक (विकेटकीपर), जैक्स रूडोल्फ, जॉन्टी रोड्स (कर्णधार), लांस क्लूजनर, जोहान बोथा, वर्नोन फिलेंडर, जोहान वॅन डेर वाथ, गार्नेट क्रूगर आणि मखाया एनटिनी. 

कधी,  कुठे पाहाल सामना?

इंडिया लीजेंड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका लीजेंड्स यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल.  सामना कानपूर येथील ग्रीन पार्क मैदानात खेळवला जाणार असून कलर्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर सामना पाहता येणार आहे. तसंच वूट (Voot) आणि जिओ टीव्ही अॅपवरही (Jio TV) सामना पाहता येईल.  

कसं आहे इंडिया लीजेंड्सचं वेळापत्रक? 

तारीख सामना ठिकाण वेळ
10 सप्टेंबर

इंडिया लीजेंड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका लीजेंड्स

ग्रीन पार्क, कानपूर 7:30 PM
14 सप्टेंबर

इंडिया लीजेंड्स विरुद्ध श्रीलंका लीजेंड्स

ग्रीन पार्क, कानपूर 7:30 PM
18 सप्टेंबर इंडिया लीजेंड्स विरुद्ध न्यूझीलंड लीजेंड्स होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदूर 7:30 PM
21 सप्टेंबर इंडिया लीजेंड्स विरुद्ध बांग्लादेश लीजेंड्स राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, डेहराडून 7:30 PM
24 सप्टेंबर इंडिया लीजेंड्स विरुद्ध इंग्लंड लीजेंड्स राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, डेहराडून 7:30 PM


हे देखील वाचा-