Asia Cup 2022 Final : आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी अर्थात रविवारी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (PAK vs SL) या संघामध्ये होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाला एक आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यांचा महत्त्वाचा गोलंदाज शाहनवाज दहानी (shahnawaz dahani) दुखापतीतून सावरल्याने त्यांची ताकद आता आणखी वाढणार आहे. 


शाहनवाज दहानीने स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यात भारताविरुद्ध कमाल कामगिरी केली होती. त्याने गोलंदाजी भेदक केलीच होती, पण सोबतच फलंदाजीतही चमक दाखवत थोड्या पण स्फोटक धावा केल्या होत्या. त्यानंतर सुपर-4 मध्ये पाकिस्तानच्या भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी सरावादरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे पुढील तीन सामन्यात तो पाकिस्तान संघाकडून खेळला नव्हता. पण आता तो दुखापतीतून सावरल्याची माहिती समोर येत असल्याने आता तो फायनलच्या सामन्यात श्रीलंका संघाविरुद्ध मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.


शाहनवाज दहानीचा जोरदार सराव सुरु 


24 वर्षीय वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी अंतिम सामन्यापूर्वी जोरदार सराव करताना दिसून आला आहे. दहानीच्या आगमनाने पाकिस्तानचं गोलंदाजी आक्रमण अधिक मजबूत होणार आहे. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्यास मोहम्मद हसनैनला बाहेर बसावे लागेल. नसीम शाह, हारिस रौफ आणि शाहनवाज दहानी हे त्रिकुट अंतिम सामन्यात अॅक्शन करताना दिसू शकतात.


फायनल आधी श्रीलंकेचा पाकिस्तानवर विजय


आशिया चषक 2022 स्पर्धेत (Asia Cup 2022) अप्रतिम कामगिरी करत पाकिस्तान आणि श्रीलंका (Pakistan vs Sri Lanka) हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. पण या दोन्ही संघामध्ये फायनलपूर्वी शुक्रवारी सुपर 4 मधील अखेरचा सामना या दोघांमध्येच पार पडला. या सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानला 5 गडी राखून मात दिली आहे. श्रीलंकेची चेस करताना सुरुवात खराब झाली असताना देखील सलामीवीर पाथुम निसांका याने टिकून राहून अर्धशतकी खेळी करत सामना जिंकवून दिला.  यावेळी श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला होता. त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत 19.1 षटकांत पाकिस्तानचा डाव रोखत त्यांना 121 धावांवर रोखलं. ज्यानंतर श्रीलंकेचा संघ 122 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आला असताना त्यांची सुरुवात खराब झाली. सुरुवातीचे काही गडी स्वस्तात बाद झाले. पण सलामीवीर पाथुम निसांका याने टिकून राहून अर्धशतकी खेळी करत सामना जिंकवून दिला. 


हे देखील वाचा-